नांदगाव हायस्कूल,कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल.

नांदगाव हायस्कूल,कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल.

उत्तम ब्राम्हणवाडे.


नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीसुद्धा बारावीच्या परीक्षेमध्ये प्रावीण्य प्राप्त केले आहे. विज्ञान व वाणिज्य विभागाचा निकाल १०० टक्के, कला विभागाचा निकाल ९८ टक्के व विज्ञान विनाअनुदानीत विभागाचा निकाल ९९ टक्के लागला आहे.
विज्ञान विभागातून खुशी प्र. कारमोरे हिने ८६.८३ टक्के गुण मिळवून प्रथम, गौरी सु. भस्मे हिने ८५.५० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर वैष्णवी ह. डुकरे हिने८९.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. वाणिज्य विभागातून कीर्ती ज्ञा. समरित ८२.८३ हिने टक्के गुण मिळवून प्रथम, कल्याणी श्या. बावणकुळे हिने ७९.५० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर कृतिका ला. कांबळे हिने ७५.५० टक्के गुण मिळवून तृतीयक्रमांक पटकाविला आहे. कला विभागातून प्रतीला न.थोरात हिने ८०.५० टक्के गुण मिळवून प्रथम, अनिकेत ग. अजमिरे याने ७६.१७ गुण मिळवून द्वितीय तर साक्षी गौ. वासनिक हिने ७४.६७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. विज्ञान विनाअनुदानीत विभागातूनगायत्री दि. लुटे हिने ७१.६७ टक्के गुण मिळवून प्रथम, कपिल देठे व तनय म. सव्वालाखे यांनी ७०.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय तर कृष्णा वै. मेंडे याने ६९.५ टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या प्राचार्या वानखडे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी सुनीता मोहोड व अर्चना बेलसरे यांनी गौरव केला. यावेळी शिक्षक रोशन कपिले, जयश्री शिंदे, प्रतीक्षा कळमकर, शिक्षकेतर कर्मचारी कृष्णा सैरिसे, किशोर भेंडे, एस. एस. लव्हाळे, अठसोड, नालट आदी उपस्थित होते.

Comments

Anonymous said…
Very nice 👍👍

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात