अखेर वन्य प्राण्याच्या हल्ल्यात जखमी युवकाचा मृत्यू.

मंगेश अडसपुरे मृतकाचे नाव.

माहुली (चोर) जवळील घटना.

उत्तम ब्राम्हणवाडे.

 गेल्या तीन दिवसा अगोदर माऊली (चोर) ते जसापुर गौरक्षण मार्गाजवळ तीन ते चार रोहि हे सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान रोडवरून जाणाऱ्या वाहनांना आडवे आल्यामुळे माहुली गावातील युवक मंगेश अडसपुरे व शुभम ओलीउकर यांच्या वाहनाला जबरदस्त धडक दिल्याने मंगेश अडसपुरे (वय 45 ) याला जखमी अवस्थेत अमरावतीला खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले होते तिथे त्याच्यावर उपचार सुरू असतानाच अखेर तीन दिवसानंतर खाजगी रुग्णालया मध्ये त्या अपघात ग्रस्त युवकाचा करून अंत झाला तसेच दुसरा जखमी युवक शुभम ओलिवकर हा अजूनही रुग्णालया मध्ये उपचार घेत आहे त्या संदर्भात गावकऱ्यांनी वनविभागाला ही संपूर्ण माहिती दिलेली असून ग्रामपंचायतीने यासंदर्भात वन विभागाला त्याच्या कुटुंबाकरिता उदरनिर्वाह आणि शिक्षणाकरीता
आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. तसेच यानंतर अशा प्रकारच्या घटना होऊ नये म्हणून जसापुर ते माहुली (चोर) या चार किलोमीटर रस्त्यावर दुतर्फा तारेच्या जाळीचे कंपाऊंड बसविण्यात यावे आणि रहदारी करणाऱ्यांचा हा होणारा त्रास किंवा अपघाती निधन टाळावेअशी मागणी सुद्धा गावकऱ्यांनी वनविभागाकडे निवेदनातून केली आहे ह्या पूर्वीसुद्धा अशाच प्रकारच्या अनेक घटना येथे घडलेल्या असून याकडे वनविभागाचे अधिकारी हेतू परस्परपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.तरी संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात