एकलव्य गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनि राखली यशस्वी निकालाची परंपरा.
एकलव्य गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनि राखली यशस्वी निकालाची परंपरा.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगांव खंडेश्वर येथील स्थानिक एकलव्य गुरुकुल स्कूल ने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा एस. एस. सि. परीक्षेमध्ये उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली असून एकलव्य गुरुकुल स्कूलचा निकाल 97.36% लागला आहे त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे विद्यार्थ्यांनि अथक परिश्रमातुन यश संपादन केले आहे
त्यामध्ये कु.जान्हवी मोरे 91.80%, तर कु.वेदिका मेटकर .90.20% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला 15 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत असून तर 80ते 90% असणारे 12 विद्यार्थ्यांनि यश प्राप्त केले असून विशेष बाब म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनि शाळेमध्ये चालत असलेल्या विविध खेळामध्ये भाग घेऊन क्रीडा ग्रेस गुण चा लाभ मिळाला आणि 1 आंतरराष्ट्रीय खेळाडू कु मंजिरी आलोने वर्ग 10 मध्ये शिक्षनासोबत खेळावर लक्ष केंद्रित करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करत शाळेतपण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली असून यामध्ये कु .रिद्धी फुके 89.60% ,कु स्वर्णिमा मोरे 88 .60%, कु. तनुश्री अंबाडकर,86.40% ,मोहिनी गाढवे 84.80%,
वैष्णवी गुल्हाने 84.40% ,ईश्वरी मेटकर 87. 20% ,दर्शन राऊत 83.20% ,श्याम ताथोड 80%, अनुष्का नगराळे 80% ,वृंदा मेटकर 81.20%,मंजिरी अलोने 84.40 या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एकलव्य गुरुकुल स्कूलचे मार्गदर्शक सदानंद जाधव (शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त) विलास मारोटकर (मुख्याध्यापक )अमर जाधव (धनुर्विद्या कोच )अनुप काकडे(व्यवस्थापक ) एकलव्य अकादमीचे सर्व पदाधिकारी शाळेचे सर्व शिक्षक ,शिक्षिका, यांनी विद्यार्थ्यांनचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.
Comments