उन्हाच्या झळ्यात कोल्ड्रिंकपेक्षा ताकच भारी.
पोषकमुल्यांमुळे वाढती मागणी
शितपेयात रासायनिक घटक
उत्तम ब्राम्हणवाडे.
अंगाची लाहीलाही करणाऱ्या, अंगातून घामाच्या धारा वाहवणाऱ्या उन्हाळ्यात शीतपेयासह, आईस गोला, ब्रॅन्डेड कंपन्यांच्या कोलड्रिंककडे वळतात. परंतु या सर्वांत बऱ्याच प्रमाणात आरोग्याला हानीकारक असणाऱ्या रासायनिक घटकांचा वापर केला असतो. तुलनेत ताक, निंबू पाणी यासारखे देशी व निसर्गपूरक पेय शरीराला अधिक लाभदायक असल्याचे दिसून येते.
कडक उन्हामुळे चहाची जागा ताक, लस्सी या पेयांनी घेतली आहे. चहाच्या दरात ताक मिळत असून, त्याची पोषक मूल्ये ही जादा आहेत.यामुळे बाजारात व ग्रामीण भागातही चहाच्या तुलनेत ताक, लस्सीच भारी पड़त आहे. शिवाय, कोलड्रिंक्स, लिंबू सरबत, पन्हे, फळांचे ज्युस, उसाचा रस इत्यादी पेयांचीही धूम आहे.
उन्हाची तीव्रता प्रचंड आहे. अंगाची अक्षरश: लाही लाही होत असते. जणूकाही उष्णतेचा कहर सुरू आहे.
त्यामुळे शरीराला उष्णतेपासून वाचवण्यासाठी शरीराला गारवा मिळवण्यासाठी अनेकविध उपाय केले जात आहेत. सहाजिकच शरीराला थंडावा मिळण्यासाठी थंड पेयांची मागणी प्रचंड वाढली आहे. विशेष म्हणजे बहुतेकांचे आवडते असणारे चहा हे पेय थंड पेयांच्या तुलनेत मागे पडले आहे. उन्हाळ्याच्या झळा लागत असताना दररोजची चहाची सवय योग्य की ताक प्यावे, अशा द्विधा स्थितीत सापडलेल्यांना ताकातील पोषक मूल्य समजून ताकाला पसंती दिली आहे. शरीराची उन्हाळ्यात वाढलेली तहान भागवण्यासाठी ताक उपयोगी ठरते. उन्हाळ्यात तहान भागवत पोषण देणारे ताक अधिक उपयुक्त ठरते.
Comments