उदरनिर्वाहाचा संपूर्ण पगार कपात करून किस्त भरण्याची सक्ती.
एलआयसी हाऊसिंग लोन विभागाचा प्रताप.
उत्तम ब्राम्हणवाडे.
उदरनिर्वाहाचा संपूर्ण पगार कपात करून किस्त भरण्याची सक्ती एल. आय. सी. हाऊसिंग लोन विभागाचे व्यवस्थापक समीर लुंड यांच्याकडून केली जात असल्याची तक्रार माणिक संतोष उईके या कर्मचाऱ्यांनी केली आहे. आरबीआयचे नियम धाब्यावर बसवून किस्त आकारली जात असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
माणिक संतोष उईके यांना 23 फेब्रुवारी 2023 रोजी एलआयसी गृह कर्ज विभागाकडून तीस लाख रुपयाचे कर्ज प्रकरण मंजूर करण्यात आले आहे.त्यापैकी त्यांना 22 लाख 50 हजार रुपये रक्कम प्राप्त झाली आहे. उर्वरित सात लाख 70 हजार रुपये रक्कम त्यांना अद्यापही प्राप्त झाली नाही;मात्र एलआयसी गृह कर्ज विभागाचे व्यवस्थापकांनी आपली मनमानी करून एक लाख 9 838 रुपये किस्त भरल्याशिवाय आपणास उर्वरित रक्कम मिळणार नाही असे सदर कर्मचाऱ्यास सांगितले. त्यांना 54948 रुपये दरमहा कीस्त आकारली आहे. त्यामुळे माणिक उईके यांचा संपूर्ण पगार हा गृह कर्जाच्या हप्त्यात कपात करण्याचा निर्णय एलआयसीच्या व्यवस्थापकांनी घेतला आहे. त्यामुळे याबाबत वारंवार माणिक संतोष उईके यांनी सदर कार्यालयात चकरा मारूनही कोणताही त्यांच्यावर परिणाम झाला नाही. उलट तुम्हाला जिथे तक्रार करायची तेथे करून घ्या! एवढी रक्कम आपणास भरावीच लागेल, अशा प्रकारची सक्ती एलआयसी गृह कर्ज व्यवस्थापकाकडून करण्यात येत आहे.
माणिक उईके यांचे कर्ज प्रकरण मंजूर करतेवेळी त्यांना 276 महिन्या करिता 25,879 याप्रमाणे हप्त्याची मासिक किस्त आकारण्यात आली होती; मात्र सदर व्यवस्थापकांनी तांत्रिक घोळ करून 54948 रुपये किस्त भरण्याची सक्ती सुरू केली आहे.
याप्रकरणी तक्रार सादर करण्यासाठी उईके गेले असता त्यांची तक्रार दाखल करून न घेता त्यांच्याशीच हुज्जत घातल्याचे उईके यांनी सांगितले. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास एलआयसी होम लोन कार्यालयासमोर आमरण उपोषण कुटुंबासह करणार असल्याचा इशारा तक्रारदार माणिक संतोष उईके यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
Comments