आता कृषी सखी होणार मास्टर ट्रेनर.
खरीप हंगाम कार्यशाळा संपन्न.
बायफ आणि आयतीसी मिशनचा संयुक्त उपक्रम.
उत्तम ब्राम्हणवाडे.
आयटीसी मिशन सूनहरा कल अंतर्गत बायफ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर,भातकुली व अमरावती तालुक्यातील निवडक गावामध्ये "क्लायमेट स्मार्ट शेती कार्यक्रम" बायफ संस्थेच्या माध्यामातून राबविला जात आहे. सदर प्रकल्प हा ग्रामीण भागातील महिला शेतकरी व बचत गटाच्या महिला यांच्या सशक्तीकरनातून; त्यांचा समाजिक व आर्थिक स्थर उंचावण्यासाठी विविध घटकांची अंमलबजावणी केल्या जात आहे.
खरीप हंगामात बदलत्या हवमानानुसार आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ''महिला शेतकऱ्यांच्या शेतीशाळा" घेण्यात येत आहे. त्यामध्ये उमेदचे कृषी सखी व सीआरपी हे गावामध्यें जाऊन मास्टर ट्रेनर म्हणून काम करणार आहे.यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते, दरम्यान प्रशिक्षणात कृषी सखी यांना हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान व खरीप हंगामातील मुख्य पीक कापूस, सोयाबीन व तूर या पिकांची आधुनिक शेतीतंत्रज्ञान याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणार्थी यांना गावामध्येच हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानावर महिला शेतकरी यांच्या शेतीशाळा कशा घ्याव्यात यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणाला अध्यक्ष म्हणून अनिल खर्चानं (कृषी उपसंचालक,अमरावती) प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत नाटकर, (गटविकास अधिकारी,) डॉ. के.पी.सिंग (वरिष्ठ शास्त्रज्ञ के.व्ही.के. दुर्गापूर) तसेच प्रमुख उपस्थिती डॉ. शशांक देशमुख प्राचार्य (श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय,अमरावती,)अशोक वानखेडे, नीता कवाने (तालुका कृषी अधिकारी) रश्मी कुंभलवार,सुचितापाटील (तालुका अभियान व्यवस्थापक) यांच्या उपस्तिथीत कार्यक्रम पार पडला. सदर प्रशिक्षणाचे प्रास्ताविक राहुल इंगोले ( जिल्हा कार्यक्रम अधिकारी,अमरावती) यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार सोनवाणे तर आभार तुषार नंदेश्वर यांनी व्यक्ती केले.
Comments
हि कंपनी धंदा करण्यासाठी तुमच्या आमच्या दारात येत आहे. हळूहळू तुम्हाला सेंद्रिय शेतीच्या बद्दल पुस्तकी ज्ञान देतील तुमचाच पैसा व वेळ हे फक्त तुम्हाला सेंद्रिय शेती करण्यासाठी मागणार आहे. मोठे मोठे आश्वासन देउन तुम्हाला या प्रकल्पात समाविष्ट करून घेऊन तुम्हाला स्वप्ने पहावयास लावणार आहे.
संबंधित ITC कंपनी तुम्हाला कपाशी या आपल्या मुख्य पिका करीता कधीही प्रोत्साहन देणार नाही. आपले मुख्य नगदी पिक हे कपाशी असल्यामुळे कंपनी या बद्दल काय मत व्यक्त करते हे पहावे लागेल.या कंपनीला फक्त सोयाबिन व गहु हे शेती उत्पादने तुमच्या आमच्या कडून उत्पादन करून घेणे आहे. कारण ITC कंपनीला आपला गहु व सोयाबीन हे मुख्य शेत माल परदेशात जास्त भावात विक्री करून कंपनीला नफा कमवायचा आहे. कृपया या मागे लागु नये.
तुम्हाला एकच सांगतो कोणत्याही कंपनीच्या मागे कृपया लागु नका. राहिला सेंद्रिय शेतीचा प्रोजेक्ट विषयी तर तुम्हाला एकच सांगतो हि शेती म्हणजे आपले वाडवडिलांची, पणजोबा करीत असलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय. हि शेती ते त्यावेळी करीत होते आता आपल्या साठी काळाची गरज झालेली आहे.
आपले भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या अनेक योजना आपल्या शेतकऱ्यांच्या साठी उपलब्ध आहे. आपला कृषी विभाग या करिता सक्षम आहे. कृषी विभागाचे कर्मचारी आपल्या करीता शेती विषयक माहिती देण्यासाठी तयार आहे.आत्मा योजना सर्वात सुंदर आहे. दुर्गापूर शेती विज्ञान केंद्राचे मा.श्री. सिंग साहेब आपल्याला शेती विषयी मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे. याच बरोबर शेती करीता बरेच मार्गदर्शक शेतकरी आपल्या महाराष्ट्रात आहेत. या सर्वांचे मार्गदर्शन आपल्याला लाख मोलाचे आहे. या करिता कोणत्या तिसऱ्या वेगळ्या कंपनीची आपल्याला काय गरज आहे.?
शेतकऱ्यांनो जागे व्हा..