युवकाचा रक्त बंबाळ अवस्थेत आढळला मृतदेह.
शरीरावर अनेक ठिकाणी धारदार शञाचे वार!
तालुक्यात उडाली एकच खळबळ.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्र्वर पासून जवळच असलेल्या मोखड येथील सावनेर रोडवर मालानी गिट्टी,डांबर प्लांट जवळ दि.८/७/२०२३ रोजी सांयकाळी ७..०० वाजताच्या सुमारास युवक आकाश गजानन सहारे (वय २५ वर्ष) रा. सावनेर येथिल हा मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली मृतकाचे डोक्यासह मानेवर आणि कंबरेवर हातावर पाठीवर धारदार शस्त्राचे वार आढळून आले असल्याने तो युवक मृताअवस्थेत आढळून आला त्यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत जगदाळे यांनी घटनास्थळाला भेट दिली असून पुढील तपास नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विशाल पोळकर करीत आहेत.
Comments