माझ्या पत्नीकडे वाईट नजरेने का पाहतो या कारणावरून केला युवकाचा खून.
तपासाची चक्र फिरवताच काही तासाच्या अंतरावर आरोपीला केली अटक
उत्तम ब्राम्हणवाडे.
तालुक्यातील नांदगाव खंडेश्वर ते मोखड रोड येथे आकाश गजानन सहारे (वय २५ वर्ष) या तरुणाचा चारित्र्याच्या संशयावरून आरोपी अंकुश दामोदर हंबर्डे ( 33 वर्ष ) रा.सावनेर ता. नांदगाव खंडेश्वर याने दिनांक ८/७/२०२३ रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास कोयत्याने आकाश याच्या डोक्यावर, मानेवर, तसेच शरीराच्या इतर भागावर सुद्धा धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून केला.
याप्रकरणी मृतक आकाश गजानन सहारे याचा भाऊ फिर्यादी महादेव गजानन सहारे वय 31 वर्षे राहणार सावनेर ता. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती यांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.याप्रकरणी आरोपी अंकुश दामोदर हंबर्डे यास दिनांक 8 जुलै रोजी रात्री 12 : 00 वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली. ही घटना नांदगाव खंडेश्वर ते मोखड रोडवर मालाणी गिट्टी खदान समोर घडली.
याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी हा मृतक यास तू माझ्या पत्नीकडे वाईट नजरेने का पाहतो? यावरून झालेल्या जुन्या वादावरून कोयत्याने मारून त्याला ठार केले. असा जबानी रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अपराध क्रमांक 290/2022 कलम 302 भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून काही तासाच्या अंतरावर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार विशाल पौळकर यांच्या मार्गदर्शनात एएसआय विनोद कुरळकर, गणेश खंडारे, सतीश गावंडे, निखिल मेटे, दिनेश वानखडे, विष्णू तीरमारे, रंजीत गवई, प्रशांत पोकळे, गोपाल शेंडे राहुल गजबे हे करीत आहेत.
Comments