नेते , पदाधिकारी जोमात ; कार्यकर्ते मात्र कोमात !

नांदगाव तालुक्यातील वास्तव चित्र.

मतदारांनी करायचं तरी काय हाच प्रश्न.?

उत्तम ब्राम्हणवाडे.

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी आपापल्या नेत्यांना भेटून व शुभेच्छा देऊन जरी आले असले, तरी निवडणुकीतील महत्त्वाचा घटक म्हणजे कार्यकर्ता अजून जागेवरच आहे. कोणता झेंडा घेऊ हाती, अशी परिस्थिती कार्यकर्त्यांसमोर उभी आहे.
त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी जरी जोमात असले, तरी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कार्यकर्ते कोमात असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
शरद पवार व अजित पवार या दोघांनाही मानणारे नेते व पदाधिकारी हे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात गेली अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत; मात्र निवडणूक ही फक्त नेते व पदाधिकारी यांच्यावर अवलंबून नसून, ती तळागाळातील कार्यकर्त्यांवर अवलंबून असते. त्यामुळे नेते, पदाधिकारी जरी विभागले गेले असले, तरी कार्यकर्ता कुठे आहे हे येणाऱ्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीने नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पुढील काळात मोठ्या प्रमाणावर राजकारण तापणार आहे हे नक्कीच आहे. राष्ट्रवादी पक्षात याआधीचे वातावरण वेगळे होते तर यानंतरचे वातावरण वेगळे असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अजूनही कोण, कोणाबरोबर जाणार हे आजतरी सांगता येणार नाही. अजून पुलाखालून पाणी वाहून जाणे खूप बाकी आहे . सध्याच्या काळातील मतदार मतदान करताना खूप विचार करून मतदान करतो. पक्षाचे नेते किंवा पदाधिकारी यांच्या सांगण्यावरून मतदान होत नाही, तर पक्षाचे धोरण, सध्याची परिस्थिती, पुढील काळातील परिस्थिती या गोष्टी लक्षात घेऊन मतदान केले जाते; मात्र सध्याच्या राजकारणाची परिस्थिती पाहता भविष्यात कोणाला मतदान करायचा याचा विचार मतदार देखील करणार असे देखील बोलले जात आहे.
मतदानाचा टक्का कमी होण्याची शक्यता.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणाचा मतदारांवर मोठा परिणाम होताना दिसत असून, काहीजण उघड बोलताना दिसून येत आहे. ज्यांनी मतदान केले त्यांनाच किंमत नसेल, तर येणाऱ्या काळात कुणाला मतदान करावे, असा प्रश्न आता मतदारांपुढे उभा ठाकला आहे. यामुळे मतदानाचा टक्का कमी होणार असल्याचेही बोलले जात आहे.

कार्यकर्ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत.

   जिल्हातील नेते व पदाधिकारी आपापल्या सोईनुसार वेगवेगळ्या गटात जरी विभागले असले,नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सध्यातरी असे काही चित्र दिसून येत नाही त्यामुळे या तालुक्यातील खऱ्या अर्थाने मतदारापर्यंत पोहचणारा कार्यकर्ता सध्या फक्त चाललेल्या घडामोडी पाहात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची तालुक्यात सध्या तरी सध्याची वेट अँड वॉच भूमिका सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात