मुसळधार पावसाने निम्न साखळी प्रकल्प धरण 'ओव्हरफ्लो'.

शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान.

उत्तम ब्राम्हणवाडे.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मंगळवारी ११ जुलै रोजी मध्यरात्री मुसळधार पावसामुळे साखळी प्रकल्प ओहरफ्लो झालेला आहे. त्यामुळे परिसरातील ज्या जमिनी भूसंपादित केल्या नाही त्या शेतांमध्ये साखळी प्रकल्पाच्या धरणाचे पाणी शिरले आहे. साखळी प्रकल्प आणि साखळी नदी तुडुंब भरल्यामुळे नदीला आलेले पूर धरणाकाठच्या शेतामध्ये शिरल्यामळे पिकांचे नुकसान झाले आहे.
परिसरातील ढगाळा येथील 
नितेश कानबाले, मंगेश कानबाले यांच्या शेतामध्ये पाणी शिरून शेत जमीन खरडून गेली तर कुठे शेतात तुडुंब पाणी भरलेले आहे. साखळी प्रकल्प झाल्यापासून सलग तीन वर्षापासून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. धरणाच्या बॅक वॉटर मुळे परिसरातील नदी, नाले तुडंब भरलेले असून त्यामूळे ते पाणी थेट शेतात शिरत आहे. साखळी प्रकल्प केली आहे.
धरणामुळे शेतकरी पूर्ण हवालदिल झाला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा कसे जगायचे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. साखळी प्रकल्प धरण होण्यापुर्वी कधिच नुकसान झाले नाही असा रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे साखळी प्रकल्पाच्या पाण्यामुळे नुकसान होत आहे. त्यांच्या शेतीचा सर्व्हे करून पाटबंधारे विभागांने वाढीव जमिनी भूसंपादित कराव्यात व त्यांना योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात