सर्वच भाजीपाल्याच्या भावात प्रचंड वाढ.

आवक घटल्याने भाजीपाला कडाडला.

 नागरिकांना बसत आहे महागाईचे चटके.

उत्तम ब्राम्हणवाडे.

 भाजीपाल्याल्यासह कडधान्य डाळीस महागाईचा जबर फटका बसल्याने गृहीणीसह सर्वसामान्य नागरिकाना महागाईचे चटके बसत आहेत. वातावरणातील बदलाने भाजीपाल्याची आवक कमी होवून भावात वाढ झाली आहे. सर्वात जास्त मिरची, गवार,अद्रक, लसुण, टमाटर, वागे, फुलकोभी, लिंबू यांचे भाव कडाडले असून इतर भाजीपाला देखील महाग झाला आहे.
जवळपास सर्वच भाजीपाल्याच्या भावात वाढ होत असतांना दुसरीकडे कांद्याच्या भावातही मोठी वाढ सुरूच असल्याने कांदा उत्पादक शेतकरी सुखावला आहे. इंधनापासून घरगुती गॅस सिलेंडर पर्यंत सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्याने गृहणीचे बजेट कोलमडले आहे.
वातावरणातील बदलाने भाजीपाला पिकांना फटका बसत असल्याने उत्पादनात मोठी घट होत आहे. त्यामुळे सर्वच लहान-मोठ्या शहरांमध्ये भाजीपाल्याच्या भावात मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. पेट्रोल डिझेल, गॅसपाठोपाठ आता भाजीपाला देखील महाग झाला आहे. मटण, मासे, डाळींचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वधारले आहेत.
याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून त्यांचे बजट कोलमडले आहे. काही महिन्यांपूर्वी भाजीपाल्याचे दर इतके कोसळले होते की, ते फेकून देण्याची वेळ शेतकर्‍यावर आली होती. आता शेतकर्‍यांच्या मालाला भाव चांगला मिळतोय मात्र बदलत्या हवामानाचा फटका बसून उत्पादनात घट होऊन भाव वाढीनंतरही शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली आहे.
  नांदगाव खंडेश्वर शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी व किरकोळ विक्रेते भाजीपाल्याची दुकाने लावतात. बाजारात इतर वस्तूंसोबत धान्य व भाजीपाला खरेदी करण्यासाठी शहर व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने येतात. आठवडी बाजारात जवळपास सर्वच भाजीपाल्याच्या भावात मोठी वाढ झाली असल्याचे चित्र होते. हिरवी मिरची 160 रुपये, गवार 120 रुपये, गिलके 80 रुपये, कारले 75 ते 80 रुपये, शेवगा 75 ते 80 रुपये, भेंडी 75 ते 80 रुपये किलो तर पालकभाजी 12 ते 15 रुपये जुडी व लिंबू 8 ते 10 रुपये प्रति 1 नग भाव आहे.
उन्हाळ्यात सरबतसाठी लिंबूचा जास्त वापर केला जातो. मात्र यंदा कधी अवकाळी पाऊस तर कधी वादळी वारा; याचा परिणाम लिंबू उत्पादनावर झाला असून कमी आवकेमुळे भाववाढ झाली आहे. दरवेळी कांद्याच्या भावाविषयी ओरड केली जाते. कांद्याच्या भावात थोडी वाढ झाली तरी गल्ली ते दिल्ली सर्वसामान्यांपासून नेत्यांपर्यंत बोंबाबोंब करतात. सध्या कांद्याला भाव मिळत असतांना मात्र याबाबत कोणीही काहीही बोलायला तयार नाही, अशी खंत कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.
......................................................................
भाजीपाल्याच्या भावात वाढ झाल्याची ओरड केली जात असली तरी आम्हाला या दरवाढीचा कोणताही फायदा नाही. खते, बी-बियाण्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून मजुरी देखील वाढली आहे. त्यात अवकाळी, अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट झाली. एकरी 20 ते 25 टक्केच उत्पन्न निघत आहे. त्यामुळे पिकांवर केलेला खर्च देखील निघत नसल्याने भाववाढ होऊन देखील आमच्या पदरी काहीच पडत नाही.

   - निलेश गांडोळे 
भाजीपाला उत्पादक शेतकरी,अडगाव बु.
......................................................................

महागाई गगनाला भिडली असून बाजारात आल्यावर काय घ्यावं आणि काय नाही; असा प्रश्न पडतो. केंद्र आणि राज्य शासनाने महागाईवर नियंत्रण ठेऊन सर्वांना दिलासा द्यावा.

- सौ.जयश्री मोरेश्वर दिवटे
गृहिणी, नांदगाव खंडेश्वर

Comments

Anonymous said…
भाजीपाल्याचे भाव जरी प्रचंड वाढले असतील ,त्याला कारण ही तसच आहे पावसाल्यामुळे पण फुल गळून झाडांवर रोग येतो ,त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट होते,100 किलो च्या जागेवर जर 5 किलो भाजी पिकत असेल तर भाव पण वाढतील यात बिचाऱ्या कासत्काराचा का घाटाच आहे, त्या मुळे भाजी ऐवजी कड धान्याचा उपयोग करावा,पण ओरड। करू नये

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात