निम्न साखळी प्रकल्पालगतच्या नाल्याकाच्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करून बुडीत क्षेत्रात समाविष्ट कराव्या.

अन्यथा मनसे धरण क्षेत्रात जलसमाधी घेणार.

जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला इशारा.

उत्तम ब्राम्हणवाडे.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खानापूर,सालोड, मलकापूर,गोळेगाव,जगतपुर ही गावे निम्न साखळी प्रकल्पालगत येत असल्यामुळे ह्या गावातील नाले व नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये धारण ओव्हर फ्लो झाल्यामुळे नदी व नाण्यांचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरले आणि शेतीचे व पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नदी व नाल्या लगतच्या जमिनी पूर्णपणे खरडून गेल्यामुळे त्या जमिनी शेती करण्यायोग्य राहिलेल्या नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यावर आर्थिक संकट निर्माण झालेले आहे तसेच खानापूर येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्याची विहीर बुडीत क्षेत्रात गेल्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे व गढूळ पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे निम्न साखळी प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सार्वजनिक पाणीपुरवठ्याची नवीन विहीर सुद्धा बुडीत क्षेत्रामध्ये देण्यात आलेली आहे आणि पाणीपुरवठा बंद आहे ह्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीमध्ये गैर पव्यवहार झाला असल्याचा संशय निर्माण झालेला आहे ह्या सर्व प्रकरणाची नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाल्यालगतच्या जमिनी अधिग्रहित करून बुडीत क्षेत्रात समाविष्ट कराव्या आणि खानापूर येथील पाणीपुरवठा संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कार्यवाही इत्यादी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आल्या वरील मागण्या पंधरा दिवसाच्या आत पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धरण क्षेत्रामध्ये जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे निवेदन देतेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष गजानन काजे,तालुका अध्यक्ष निलेश मुधोळकर,आशिष परकर,मारुती वाघाडे, गजानन पंछीरे,प्रवीण इंगळे,मोनू जगदाळे,संजय वाघाडे,विवेक टोम्पे,कैलास नंदेश्वर,सिद्धार्थ जगदाळे, विजय वाघाडे,पुंडलिक बुरखंडे,अक्षय परकर इत्यादी शेतकरी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात