नांदगाव खंडेश्वर येथील विश्राम गृह अधिकाऱ्यांनी सोडले वाऱ्यावर.

शाखा अभियंता कधीच नसतो हजर.

अधिकारी हाकतात उंटावरून शेळ्या.

 उत्तम ब्राम्हणवाडे.

नांदगाव खंडेश्वर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह असून हे विश्रामगृह येथील अधिकाऱ्यांनी पुर्णतः वाऱ्यावर सोडले आहे येथे कुणीही अधिकारी कधीच आपल्या कर्तव्यावर हजर नसतो आणि याबाबत कुणी चौकशी केली असता त्यांना व्यवस्थित उत्तर न देता साहेब साईडवर गेले आहेत असे उत्तर देण्यात येत असल्याने हे साहेब २४ तास सातही दिवस आपल्या कर्तव्यावर असतात काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे सा.बा.विभागाचे अधिकारी आपल्या कामाप्रती किती दक्ष आहेत हेच दिसून येते ह्या विश्रामगृहामध्ये कुणीही जबाबदार अधिकारी नसल्याने नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन जावे तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे या विश्रामगृहाच्या परिसरात या विभागाचे सेतू केंद्र असून तालुक्यातील सा.बा.विभागाच्या संबंधित काही समस्या आणि अडीअडचणी असल्यास या ठिकाणी तक्रारी आणि निवेदने स्वीकारन्याची व्यवस्था या सेतू मध्ये करण्यात आलेली आहे परंतु हे केंद्र सुरू झाल्यापासूनच बंदच असून या ठिकाणी बसायला कोणत्याही अधिकाऱ्यांना वेळ नाही त्यामुळे हे केंद्र बंदच असते येथील अधिकारी हे आपल्या घरूनच सर्व कामकाज चालवित आहेत फक्त वरिष्ठ अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींचा दौरा असला की हे अधिकारी येथे दिसतात हे विशेष ! त्यामुळे अश्या कामचुकार सर्वच अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.त्याचप्रमाणे येथील विश्रामगृहाचे आरक्षण लागल्यास येथे ही सुविधा असतानाही अधिकारी नसल्याने मिळत नाही त्यामुळे नागरिकांना आल्या पावली परत जावे लागते येथील सर्वच अभियंते हे फक्त राजकीय पुढाऱ्यांच्या मागेपुढे धावण्यात व्यस्त असतात त्यामुळे हे अधिकारी नसून पुढारीच असल्याचे नागरिकांना भासवित असल्याने नागरिकांमध्ये यांच्याविषयी तीव्र संताप दिसून येत आहे.या विश्रामगृहामध्ये लिपिक,खानसामा,सफाई कर्मचारी,मैंलकुली असे सर्वच पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असून ही पदे भरण्याचे सौजन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनीआजवर दाखविले नाही त्यामुळे हे विश्रामगृह पुर्णतः वाऱ्यावर सोडण्यात आले आहे येथे फक्त एका खाजगी व्यक्तीच्या भरवश्यावर हा संपूर्ण डोलारा टाकून अधिकारी आपल्या घरूनच सर्व कामकाज चालवित आहेत. त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे हे विश्रामगृह महिण्याकाठी सा.बा.विभागाला चागली कमाई करून देत असतानाही या विश्राम गृहाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का ? हे एक न उलगडणारे कोडेच झाले आहे.त्याचप्रमाणे येथे कुणीही जबाबदार अधिकारी नसल्याने दिवसभर राजकीय पुढाऱ्यांचा येथे उच्छाद दिसून येतो तेही आरक्षण न करता.आणि याकडे येथील अभियंता हे जानीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सुद्धा नागरिकांनी केला आहे. या सर्व भोंगळ कारभाराकडे सा.बा.विभागाच्या मुख्य अभियंता यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात