निम्न साखळी प्रकल्प धरण फुल भरून मलकापूर गावालगत पाणी आल्याने गावकऱ्यांना धोका.

११ जुलै व १२ जुलै च्या दोन रात्री मलकापूरवासी राहले जागी लोकांची उडाली झोप.

पाटबंधारे विभागाच्या चुकीच्या सर्वे मुळे हलगर्जीपणामुळे मलकापूर वासियांचे पुनर्वसन वगळले.

उत्तम ब्राम्हणवाडे.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दिनांक 11 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने निम्न साखळी प्रकल्पाच्या जलसाठ्यात अवघ्या बारा तासात 165 मिलिमीटर पाऊस झाला असून या मुसळधार पावसामुळे धरण 100% पूर्ण भरलेले 11 जुलै च्या मध्यरात्री वरून मुसळधार पाऊस चालू असताना रात्रीचे च धरण फुल भरले परिस्थिती एवढी भयावह होती की धरण फुल भरले असल्यामुळे मागून मोठ्या प्रमाणात येणारा साखळी नदीला महापूर व नाल्याला पूर हे तुडुंब भरून वाहत असल्यामुळे तसेच दूरवरून शेतीचे मलकापूर गावात वाहत आलेले पाणी ह्या पाण्याला साखळी नदी धरण फुल भरले असल्यामुळे पाणी जायला मार्गच नव्हता त्यामुळे गावातील कित्येक कुटुंबांच्या घरात पाणी शिरून अन्नधान्याची व जीवनावश्यक वस्तूची नासाडी झाली गावातील लोक खूप घाबरून गेले व रात्रभर गाव जागी राहले कोणीच झोपलेले नव्हते तर कुणाच्या घरात पाण्यासोबत वाहत येणारे साप विंचू दिसु लागले गावातील लोकांच्या मनात भयानक भीती निर्माण झाली. आहे मलकापूर हे गाव अगदी साखळी नदीच्या काठावर असल्यामुळे व साखळी प्रकल्प धरण फुल भरल्यामुळे गावाला अक्षरशहा पाण्याचा वेळा बसलेला आहे गावालगत अथांग पाणी दिसत आहे त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात खूप भीती निर्माण झालेली आहे या अथांग धरणाच्या पाण्यामुळे लहान मुलांना बाहेर खेळायला सुद्धा जाऊ देत नाही अशी एकूणच परिस्थिती निर्माण झालेली आहे. आमदार प्रताप अडसड यांनी गावाला भेट दिली असता गावातील लोकांच्या समस्या समजून घेतल्या लोकांनी आमच्या गावचे पुनर्वसन व्हावे असे निवेदन दिले आहे तसेच तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी नांदगाव खंडेश्वर यांनी सुद्धा पाहणी केली आहे याआधी संबंधित पाटबंधारे विभाग यंत्रणेंनी दोन गावाचे पुनर्वसन करण्याचे ठरविले होते मलकापूर आणि ढंगाळा मलकापूर या गावचे पूर्ण घराचे चार ते पाच दिवस मोजमाप सर्वे केले परंतु त्यांच्या मनमानीमुळे मलकापूर हे गाव उठीत पुनर्वसन केले नाही तुमच्या गावाला कोणता धोका नाही पाणी येत नाही असे सांगून वगळुन टाकले त्यामुळे आता चित्र खुप विचित्र निर्माण झालेले आहे लोकांच्या मनात खूप भीती आहे त्यामुळे सर्व गावकरी एकत्र होऊन आमच्या जीवित्वाला व आर्थिक स्थितीला धोका आहे कदाचित अशाच प्रकारचा मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला तर आम्हाला झोपेतच जावे लागणार असा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे एकूणच गावकऱ्यांची मागणी आहे कि मलकापूर गावाचे पुनर्वसन व्हावे तेथील नागरिक एक मताने प्रशासनाला मागणी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात