धामक येथिल शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणा मुळे शेतकऱ्यांचे नुकसान.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे रोडच्या दोन्ही साईडने नाली बनविण्यात न आल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात रोडवरील पाणी हे गेल्याने या रोडच्या आजू बाजूला असणाऱ्या अदांजे २०० एकर शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणि शेती संपूर्ण पाण्यात बुडाली आहे याबाबत धामक येथील शेतकऱ्यांनी गेल्या १० वर्षापासून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बडनेरा येथील अधिकाऱ्यांसह वरीष्ठ अधिकारी यांना सतत तक्रारी करून याचा अनेकदा पाठपुरावा केला परंतु त्यांच्याकडून या सर्व तक्रारींना वाटण्याच्या अक्षदा दाखविण्यात आल्याने आज धामक येथील शेतकऱ्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. गेल्या आठवड्यामध्ये येथील शेतकऱ्यांनी उसंनवारीने बियाणे आणून शेत्तात पेरणी केली परंतु गेल्या दोन दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्याने हे पाणी बांधकाम विभागाने बनविलेल्या सिमेंट रोडमुळे शेतकऱ्याच्या शेतात जाऊन साचल्याने संपूर्ण पीक खरडून गेले आहे.आता याला जबाबदार कोण ? धामक येवती रोडच्या दोन्ही बाजूला जर नाल्या बनविल्या अस्त्या तर शेजाऱ्याच्या पिकाचे येवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नसते त्यामुळे शेतकऱ्यांनी बांधकाम विभागाच्या विरोधात आता न्यायालयात जाण्याची धमकी दिली आहे.याबाबत अधीकारी हे नेहमीच उडवा उडविची उत्तरे देऊन मोकळे होतात त्यामुळे अश्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी माजी सरपंच प्रवीण चौधरी यांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंडळाचे हलगर्जीपणा मुळे नुकसान होत आहेत रोड लगत असलेल्या नाली है पुर्ण पणे बुजलेल्या आहेत पाणि जाण्यासाठी रोड क्रॉस करुन मोठा पुल बांधकाम करणे आवश्यक आहेत,
त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तुडुंब भरणार नाही,
मागिल काही वर्षांपासून असेच नुकसान होत आहेत सुमारे, अदांजे २०० एकर जमिन मध्ये पाणिच पाणी आहेत त्यामुळे सा बां मंडळ यांनी शेतकरी वर्गानां नुकसानभरपाई द्यावी,
राजेश फुलुके
सार्वजनिक बांधकाम विभाग बडनेरा यांच्या गलथान कारभारा मुळे रोडच्या दोन्ही साईडने नाल्यां काढन्यात न आल्याने रोडचे पाणी संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतात गेले आहे त्यामुळे शंभर ते दोनशे एकर शेती पाण्याखाली बुडली आहे तसेच याबाबत आम्ही पाच ते दहा वर्षापासून अनेक वेळा तक्रारी दिल्या परंतु बांधकाम विभागाने त्याकडे लक्ष दिले नाही आता सुद्धा आम्ही बांधकाम विभागाला तक्रार देणार तसेच बांधकाम विभागाच्या विरुद्ध सर्व शेतकरी मिळून आम्ही कोर्टात बांधकाम विभागाच्या विरुद्ध दाद मागून नुकसान भरपाई ची मागनी करणार आहोत
प्रविण चौधरी
माजी संरपच,धामक
पुल आणि नाल्या बांधून झाल्या आहेत जेव्हा गावातून निवेदने आली तेव्हा मी अधिकाऱ्यांना पाठविले आहे.
राजेश सोनवाल
Comments