माऊली चोर येथे दुबार पेरणीची संकट.
माऊली चोर येथे दुबार पेरणीची संकट.
उत्तम ब्राम्हणवाडे.
येथील शेतकऱ्यांनी दिनांक सात जुलै च्या अगोदरची पेरणी केली त्यामध्ये तर बऱ्याच प्रमाणात पीक निघालेच नाही परंतु दिनांक 6, 7, 8, 9 .जुलै ह्यावेळी ज्या पेरण्या केल्या तेव्हा सतत दोन ते तीन दिवस जोराचा पाऊस आल्यामुळे काही पेरण्या निघाल्याच नाही आणि ज्या पेरण्या निघाल्या त्या अर्धवट निघाल्या आणि म्हणून ती पेरणी खंड पडून निघालेली आहे म्हणून शेतकऱ्यांना दुबार पेरणी पुन्हा करावी लागली आहे यामध्ये साधारणता 180 ते 200 बॅगेचे पेरणी करावी लागली अशाच वेळात वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची निघालेली तूर व पेरलेली तूर खाऊन टाकली अशावेळी शेतकरी वर्ग आता सध्या मोठ्या संकटात पडलेला आहे पेरणीची वेळ निघून गेलेली आहे आणि यासोबत वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव यामुळे शेतकऱ्यांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा आपल्या शेतात रात्रीचे झोपाव जावे लागते ही आश्चर्याची भाव आहे आणि यामध्ये शेतकऱ्यावर रात्रीचे संकट कोसळल्यास त्याला जबाबदार कोण आणि म्हणून शेतकऱ्यांमध्ये अशा प्रकारची चर्चा आहे की शासनाद्वारा वन विभागाला त्यांनी त्यांचे कुंपण करावे किंवा ते वन्यप्राणी दूर कुठेतरी घेऊन जावे अन्यथा याची मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी जेणेकरून त्या शेतकऱ्याला होणाऱ्या उत्पादना एवढा लाभ देण्यात यावा असे ग्रामस्थ शेतकरी यांच्या वर्गामध्ये चर्चा होत आहे तेव्हा यावर शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही विनंती संपूर्ण शेतकरी टाहो फोडून करीत आहे.
Comments