नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी मुळे मोडले शेतकऱ्यांचे मोडले कंबर्डे.
काँग्रेस नेते परिक्षीत जगताप यांनी केली शेताची पाहणी.
तहसीलदार यांना दिले निवेदन
उत्तम ब्राम्हणवाडे.
काल दिनांक 18 जुलै 2023 रोजी रात्री झालेल्या ढगफुटी मुळे खंडेश्वर तालुक्यामध्ये अति प्रचंड प्रमाणात मध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे,पहिलेच पाऊस उशिरा आला,ज्या जा भागात पाऊस समाधान कारक आला आहे,त्या शेतकऱ्यांनी पेरणी केली,त्या पेरणीवर पाऊस आला नाही त्या मुळे शेतकऱ्यमा दुबारा पेरणी करावी लागली, त्या मध्ये शेतकऱ्यांचे कंबर्डे मोडले,कसा बसा शेतकरी सवाराला तर काल रात्री झालेल्या ढगफुटी मध्ये तूरपाशी, तूर, कपाशी,मुंग व उडद ह्या संपूर्ण पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शिवणी रसूलापूर मंडळ, मंगरूळ चवळा मंडळ,धानोरा गृह मंडळ, तसेंच संपूर्ण तालुक्यामधिल 8 ही मंडळ मध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,तसेंच शेतकऱ्यांच्या शेतामधील ड्रीप,स्प्रिंकर पाईपा चे सुद्धा नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे शेतामधील ड्रीप जमिनी मधील दोन फूट आतमध्ये ड्रीप सुद्धा बाहेर निघालेली आहे.त्याची पाहणी मा.परीक्षित वीरेंद्रभाऊ जगताप यांनी स्वतः व शेतकऱ्यांना शेताचा बांध्यावर जाऊन पाहणी केली व लगेच तहसील कार्यालय नांदगाव (खंडे) येथील तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन दिले. व प्रशासनाने तात्काळ पंचनामे सुरु करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50000/-( एक लाख) एवढी मदत जाहीर करावी.अशी निवेदनाद्वारे प्रशासनाला मांगणी करण्यात आलेली आहे.त्या वेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव परीक्षित वीरेंद् जगताप,तालुका अध्यक्ष निशांत जाधव,युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष दिपक भगत,अमोल ढवसे,विक्रम झाडें,राजेश जाधव,ज्योतिपाल चवरे, राजेश काजे,शेख मुमताज हारून शेख,विनोद जगताप,गोपाल भगवे,मधुकर गाढवे,सुनिल गावणर,दिवाकर भगवे,विकास भगत,अजय भगत,सुजल ठाकरे,वैष्णव मेटकर,प्रतिक गावणर,दिलीप,भगत,सचिन खोडके,चेतन धवणे व इतर कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Comments