अंजनगाव बारी -बडनेरा राजमार्ग रस्त्याचे काम अपूर्ण.
सा.बा.विभागाचे दुर्लक्ष अंजनगाव बारी - राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम रखडले, नागरिकांसह विद्यार्थ्यांवर्ग त्रस्त.
२४ कोटी निधी सा.बा.विभागकडे सुपुर्द,रस्त्याचे काम का रखडले नागरिकाचा सवाल?
उत्तम ब्राम्हणवाडे.
बहुचर्चित अंजनगाव बारी-बडनेरा कित्येक वर्षांपासून रखडलेल्या राजमार्ग रस्त्याच्या कामाला अखेर मुहुर्त मिळाला हा रस्ता बडनेरा -अंजनगाव बारी- मालखेड (रेल्वे) पर्यंत मार्गक्रमण करतो त्याकरीता २४ कोटीचा निधीही मंजूरात असुन तो सा.बा.विभागाकडे हस्तांतरित केला असुन त्यापैकी मालखेड ते पार्डी(देवी) तर अंजनगाव बारी राष्ट्रीय महामार्गाच्या ते जुनी वस्ती मार्गे कोंडेश्वर नाक्या पर्यंतच्या रस्त्याचे काम झाले असुन अंजनगाव बारी- राष्ट्रीय महामार्गा क्र.६ पर्यंतचा ५ किमी. रस्त्याचे काम रखडले असुन दररोज शेकडो वाहने व २२ गावातील प्रवासी नागरिकांसह,शेतकरी व विद्यार्थ्यांना रस्त्याने ये-जा करणे असह्य झाले आहे.त्यामुळे ऊर्वरित रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सध्या पावसाळा सुरू असुन रस्त्याची दुरवस्था पाहून नागरीकांना आपला जिवन मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यानी जागोजागी खड्डेच खड्डे पडले असून त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून प्रवाशांना आपली वाहणे चुकवून प्रवास करावा लागत आहे.अशातच चुकवून ओव्हरटेक करताना प्रवाशांचा अपघात होऊन जिव गमावण्याची वेळ येत आहे.गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यानी किरकोळ ते मोठ्या अपघाताच्या घडल्या असुन नागरिकांनी या जिवधेण्या रस्त्यानी प्रवास करावा लागत असल्याचे समजते.
लोकप्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार या संपूर्ण रस्त्यासाठी २४ कोटीचा निधी सा.बा.विभागाकडे सुपुर्द केला असुन राहीलेल्या ५ कि.मी. रस्त्याचे कामच का रखडले असा प्रश्न नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार हा रोडची रुंदी वाढविण्यात येणार असुन निधी मिळूनही रस्त्याच्या कामाला सा.बा.विभाग विलंब का लावत आहे असा प्रश्न नागरीकांना पडलं आहे.सा.बा.विभागाचे दुर्लक्ष व लोकप्रतिनिधीची अनास्थेमुळे रस्त्याचे काम रखडल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
'या रस्त्यासाठी मंजूरात २४ कोटी रुपयांचा निधी सा.बा.विभागाकडे पडून आहे रस्त्याचे बरचसे काम पुर्ण झाले असुन ऊर्वरित रस्त्याचे काम का रखडले या एकही लोकप्रतिनिधीं बोलण्यास तयार नसुन सा.बा.विभाग यावर चुप्पी साधून आहे.आणखी किती अपघाताचे बळी सा.बा.विभाग पाहणार आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.जर रस्त्याचे काम लवकरात लवकर न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरुन संबंधित प्रशासनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.'
-- प्रमोद निचत,नागरिक, अंजनगाव बारी.
'अंजनगाव बारी-बडनेरा रोड पुर्णपणे खराब झाला असून,यासंदर्भात वारंवार निवेदने व पाठपूरावा करून सुद्धा सां.बां.विभागाचे याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे शेतकरी, प्रवासी नागरिक व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.राहीलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास आम्ही आंदोलनाचा पवित्रा उचलणार आहे.'
'आम्ही या रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधींच्या मदतीने रोडसाठी २४ कोटीचा निधी मंजूर करून घेतला व तो सा.बा.विभागाकडे पडून असुन ऊर्वरित राहीलेल्या रस्त्याच्या काम का रखडले हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करणार आहे.'
Comments