मुसळधार पावसामुळे साखळी नदीने गाठली धोक्याची पातळी.
निम्न साखळी प्रकल्प धरण आधीच ओव्हर फ्लो.
मलकापूर वासियांसाठी धोक्याची घंटा.
साखळी धरणाची थोप वाढल्यामुळे मुळे येणाऱ्या पाण्याला जायला मार्ग नसल्यामुळे लोकांच्या घरात शिरले पाणी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दिनांक 11 जुलै रोजी झालेल्या ढगफुटी मुसळधार पावसामुळे साखळी नदीला महापूर आला असता एका रात्रीतूनच निम्न साखळी धरण ओव्हर फ्लो झाले आहेत त्यातच पुन्हा एकदा विदर्भात मुसळधार पावसाचा जोर वाढल्यामुळे दिनांक 21 व 22 जुलै रोजी पुन्हा एकदा साखळी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असुन साखळी प्रकल्प आधीच ओव्हरफुल असल्यामुळे साखळी धरणाच्या पाण्याची पातळी अधिक वाढल्यामुळे नदीकाठच्या मलकापूर या गावाला पुन्हा एकदा पाण्याचा वेढा बसलेला आहे गावकऱ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे गावकऱ्याचा पुनर्वसनासाठी लढा चालू आहे आमच्या मलकापूर गावचे पुनर्वसन व्हावे आम्हाला या संकटातून भीतीतून बाहेर काढावे अशी गावातील सर्वत्र लोकांची मागणी आहे तसेच प्रशासनाला गावकऱ्यांनी तीन ते चार दिवस आधी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती पाटबंधारे विभाग अमरावती.उपविभागीय अधिकारी चांदुर रेल्वे..तहसीलदार नांदगाव खंडेश्वर... यांना कळविले आहे आमचे गाव अगदी साखळी नदीच्या काठावर असून साखळी धरण फुल भरले असून गावाला पाण्याचा वेढा बसल्याने अधिकच धोका निर्माण झाला आहे त्यामुळे आमच्या गावचे पुनर्वसन व्हावे असे निवेदन सुद्धा देण्यात आले आहे प्रशासनाकडून मलकापूर गावाकडे लक्ष देणे गरजेचे आहे आमच्या गावचे पुनर्वसन व्हावे अन्यथा आम्ही सर्वत्र गावकरी गावातील साखळी धरणातच जलसमाधी घेऊ असा प्रशासनाला निवेदनाद्वारे विष्णु गिरी सतीश कानबाले गणेश शिंदे निवृत्ती कानबाले मंगेश कानबाले रोशन मेश्राम निखिल कांबळे प्रवीण चौधरी महिंद्र कानबाले राजेंद्र कानबाले बेबी कानबाले महानंदा राऊत माधुरी परणकर यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.
Comments