धानोरा फसी जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्या शिकस्त त्वरित दुरुस्त करा.
माजी सरपंच सुशील थोरात यांची मागणी.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा फाशी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून या ठिकाणी जिल्हा परिषद अंतर्गत एक ते सात इयत्तापर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. सदर शाळेची इमारती फार जुनी झाली असून शाळेतील काही वर्ग खोल्या शिकस्त झालेल्या आहेत. या खोल्यांची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुशील थोरात यांनी प्रशासनाकडे केली आहे.शासनाच्या शिक्षणाच्या विषयी अत्यंत धोरणात्मक कार्यक्रम असून ग्रामीण भागातील मुलांना मोफत शिक्षण देण्याचा समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येते. विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षण,मोफत भोजन,गणवेश पुस्तके इत्यादी वाटप करण्यात येते. मात्र विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेतात त्या इमारतीकडे शासनाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे.ग्रामीण भागातील शाळांचे बांधकाम पुरातन काळातील असल्याने सध्या ते बांधकाम शिकस्त झाले आहे. शाळेचे कवेलुचे छत नादुरुस्त होऊन पावसाळ्यात त्यामध्ये पाणी शिरते भिंतींना भेगा पडल्या अशा जीव घेण्या परिस्थितीत विद्यार्थी शिक्षण कसे काय घेतील? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत माजी सरपंच सुशील तर त्यांनी राज्याची उपमुख्यमंत्री तथा
Comments