शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे शाळेला ताला ठोको आंदोलन.
शिक्षकांची रिक्त पदे त्वरीत भरा-एआयएसएफची मागणी.
उत्तम ब्राम्हणवाडे.
जि प पूर्व माध्यमिक मराठी शाळा शिवणी (रसु ) येथे शाळेला मुख्याध्यापक व भाषा शिक्षक नसल्या मुळे विद्यार्थ्यांनी शाळेला ताला ठोकून आंदोलन केले . शिवणी रसुलापूर येथील शाळेमध्ये गेल्या सहा महिन्या पासून मुख्याध्यापकाचे पद रिक्त आहे . १ली ते ७वी पर्यंत असलेली हि शाळा तालुक्यात आदर्श शाळा म्हणून गणली जाते . विद्यार्थ्यांच्या पटसंख्येमध्ये सुद्धा अव्वल असलेल्या या शाळेला ७ शिक्षकांची आवश्यकता असतांना आजरोजी फक्त ४ शिक्षक कार्यरत आहे. शैक्षणिक सत्र सुरु होऊन एक महिना झाला असतांना सुद्धा येथे इंग्रजी भाषा शिकवायला शिक्षक नाही .ऑल इंडिया स्टूडंट्स फेडरेशन ( A I S F ) या विद्यार्थी संघटनेने २ शिक्षक व मुख्याध्यापकाच्या मागणी दि . ११/०७/२०२३ला मा .गटविकास अधिकारी नांदगांव खंडेश्वर यांना AISF च्या वतीने शिक्षकांच्या रिक्त पदे भरण्या बाबत निवेदन दिले होते . येत्या १५दिवसात शिक्षक व मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरण्याची मागणी AISF कडून यावेळी निवेदनद्वारे करण्यात आली. ही मागणी पूर्ण व्हावी याकरिता १५दिवसाचा कार्यकाळ देण्यात आला होता, परंतु यावर १५दिवसात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही म्हणून२५/०७/२०२३ला पुन्हा निवेदणाद्वारे ताला ठोको आंदोलन करण्याची माहिती देऊन त्यानुसार २६/०७/२०२३ला सकाळी ११:००वाजता विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानात बसून शांततेच्या मार्गाने शाळेच्या वर्गखोल्याना व मुख्याध्यापक कार्यालयाला टाळे ठोकून ए . आय . एस . एफ . च्या वतीने आंदोलन सुरु करण्यात आले, यावेळी शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी मनस्वी ढोके हिने शाळेतील अडचणी व समस्यांनवर आपली व्यथा केंद्रप्रमुख श्री . दिपक कोष्टी व गटशिक्षणाधिकारी प्रेमिला शेंडे मॅडम यांच्या समोर मांडल्या. यावेळी तिने भगतसिंगांचे प्रसिद्ध वाक्य "बहरो को सुनाने के लिये धमाको कि जरुरत होती है " या वाक्याची आठवण देवून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याकरिता आम्ही आज येथे आंदोलन करीत असल्याचे या चिमुकल्या विद्यार्थिनीने सांगितले, या आंदोलनात कायदा व सुव्यास्था राखण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दिंडोडकर व त्यांचे सहकारी उपस्थित होते. AISF चे पदाधिकारी, गावातील पालकवर्ग यांच्यासोबत चर्चा करून केंद्रप्रमुख व मा .गटशिक्षणाधिकारी यांनी येत्या १४/०८/२०२३पर्यंत माध्यमिक शिक्षकाची मागणी पूर्ण करू असे लिखी आश्वासन दिले, व मुख्याध्यापकाची मागणी ही माझ्या अंतर्गत नाही असे यावेळी सांगण्यात आले . लेखी आश्वासना नंतर आंदोलन मागे घेण्यात आले .शिवणी रसूलापूर जि प शाळा ही आदर्श शाळा असून येथे मुख्याध्यापक नाही ही पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर करिता अत्यंत खेदाची बाब आहे.
या आंदोलनाला AISF ची राज्य कार्यकारणी सदस्य कॉ. प्रतीक्षा ढोके.जिल्हा कौन्सिल सदस्य कॉ. वेदिका मरगडे, कॉ . सौरभ राजकुळे व शाखा सदस्य कॉ. यश वैरागडे, कॉ .अमित बोरकर, कॉ .रोशन वैद्य, कॉ .विकास दादरवाडे,कॉ .अक्षय मंदूरकर, कॉ . जुगल वैद्य, कॉ .प्रज्वल ढोके, कॉ . उमेश बावनकुरे पालकांमध्ये विनोद तऱ्हेकर, सचिन सुपारे, सुभाष लांबट, ञानेश्वर बनसोड, गणेश लांबट, गुणवंत ढोके, उमेश रघुते,माधव ढोके, विनोद चोपकर, मोरेश्वर वंजारी, संतोष लांजेवार, उमेश मंदूरकर,इ उपस्थित होते.
Comments