तालुक्यात डोळयाची साथ मोठ्या प्रमाणात.
काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन.
रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सध्या सर्वत्र डोळे येण्याची साथ सुरू आहे. गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये वातावरण बदलांमुळे सर्दी,खोकल्याचे प्रमाण वाढले असतानाच आता नागरिकांमध्ये डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयासह खासगी रुग्णालयेसुद्धा उपचारासाठी फुल्ल झाल्याचे दिसून येत आहे. डोळे येण्याच्या
साथीमुळे साथीमुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नागरिक चागलेच हैराण असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज ४० ते ४५ आणि खासगी रुग्णालयात दररोज त्याहीपेक्षा जास्त रुग्ण उपचाराकरिता येत असल्याचे दिसून येत आहे.
डोळे येने हा आजार संसर्गजन्य आहे. एकापासून तो दुसऱ्या व्यक्तीला जडण्याची शक्यता अधिक असते. तालुक्यात सध्या या संसर्गाचे थैमान पाहायला मिळत आहे. याबाबत नागरिकांनी योग्य काळजी घेतली नाही तर त्यांना पुन्हा संसर्ग होऊ शकतो एखाद्याला डोळ्याचा आजार झाल्यास त्याने डोळे पाण्याने स्वच्छधुवावे,डोळ्यांना वारवांर हात लावू नये,रुमालाने डोळे चोळू नये, घरातील अन्य सदस्यापासून दूर राहावे तसेच डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही औषधोपचार घेऊ नये असा सल्ला डॉक्टरानी दिला आहे.या आजाराने ग्रामीण व शहरी भागातील नागरिक चागलेच त्रस्त झाले असून यामध्ये लहान मुलाचा आणि मोठ्या व्यक्तीचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
डोळे येणे म्हणजे काय ?
सामान्यपणे आपल्या डोळ्यातील पांढऱ्या भागावर आणि पापण्यांच्या आतील भागावर पारदर्शक असा थर असतो, ज्याला कंजक्टिव्हा असे म्हणतात. डोळे येणे म्हणते याच कंजक्टिव्हाला सूज येणे होय.त्यामुळे या आजाराची योग्य प्रकारे काळजी नागरिकांनी घ्यायला हवी.
कंजंक्टाव्हाटीस,(आय फ्लू) यात विषाणूमुळे नागरिकांच्या डोळ्याच्या बुबुळाच्या भागात दाह जाणवतो,त्यामुळे डोळे चुरचुरणे,लाल होणे असे त्रास होतात. हा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी गर्दीत जाऊ नये,तसेच गॉगल वापरायला पाहिजे,वारंवार हात धूतले पाहिजे,तसेच रूग्णाचे गॉगल,रूमाल बेड शेअर करू नये. रुग्णांनी डाॅक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा घरीच औषधोपचार घेऊ नये.
डॉ मंगेश सु. पचगाडे
नांदगाव खंडेश्वर.
Comments