चांदि प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन मासेमारी संस्थेचे लाखोंचे नुकसान.
चांदि प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन मासेमारी संस्थेचे लाखोंचे नुकसान.
उत्तम ब्राम्हणवाडे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ढगफुटी सदृश अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नदि नाल्यांना पाणी साठा तयार झाला. त्यामुळे धरणाची पातळी सुद्धा मर्यादा ओलांडून वाहत आहे. त्यामुळे भोईराज मासेमारी व मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था या संस्थेकडे हे तलावक्षेत्र असल्याने संस्थेचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तलावामध्ये लाखो रुपयांची बिजवाई टाकली होती व तसेच लाखो रुपयाचे मासे वाहुन गेले. संधीचा फायदा घेत उपस्थित जमावाने सुद्धा जोर जबरदस्तीने मासे नेले. संस्थेच्या सदस्यांचा उदरनिर्वाह मासेमारी वरच अवलंबून आहे पण या प्रचंड झालेल्या नुकसानीमुळे संस्थेच्या सदस्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला. भोईराज मासेमारी व मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेकडे तलाव आल्यापासून दरवर्षी अतिवृष्टीमुळे धरण ओव्हरफ्लो होऊन नुकसान झाले आहे आणि आता सततच्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. म्हणून शासनाच्या निकषाप्रमाणे पाहिजे तेवढे उत्पन्न संस्था घेऊ शकले नाही. दरवर्षी च्या अशा नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान कसे भरून काढावे व मासेमारी व्यवसायावर उदरनिर्वाह चालविणाऱ्या संस्था सदस्यांचा तोटा कसा भरून काढावा हा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व मासेमारी सहकारी संस्थांना पडला आहे. यासंबंधीची माहिती भोईराज मासेमारी व मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष गणेश अवझाडे व प्रदिप मोरे यांनी दिली.
Comments