अडगाव येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम संपन्न.
टिबी हारेगा देश जितेंगाचा दिला नारा.
जिल्हा क्षयरोग अधिकारी यांची उपस्थिती.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र खिरसाना अंतर्गत ग्राम अडगाव येथे 14 तारखेला निक्ष्यय दिवस म्हनून साजरा करण्यात येतो त्यानिमित्त राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम घेण्यात आला आणि नागरिकांची जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमाला
जिल्हा क्षयरोग वैद्यकिय अधिकारी डॉ ज्योती खडसे उपस्थित होत्या.तसेचप्रमुख अतिथी म्हणून दिलिप देशमुख,(जिल्हा क्षयरोग सुपरवायझर)हे उपस्थित होते
कार्यक्रमाला गावांतील 40 लोकांची क्षयरोग स्वन्श्यित म्हणून रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्याची आली
निक्ष्यय मित्र श्रीमती वर्षा वाहणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आणि क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन समुदाय आरोग्य अधिकारी डॉ अनुराधा उभाळे यानी केले तर आभार प्रदर्शन आरोग्य सेवक राजेन्द्र चकुले यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशा कार्यकर्ती श्रीमती संगीता भस्मे,जयमाला चोपकर ,डॉ अनुराधा उभाले,राजेन्द्र चकुले यांनी अथक परिश्रम केले.
Comments