खेड पिंपरी गावामधला हनुमान मंदिरासमोरील संपूर्ण रस्ता गेला खरडून.
समृध्दी महामार्गाचे अधिकारी जबाबदार .
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खेड पिंपरी गावामधले शेत सालोड रस्त्याला समृध्दी महामार्गावर मुरुम टाकण्या करीता गावालगत मोठ्या प्रमाणात खोदकाम करुन तलावप्रमाने मुरुम खदान तयार केली असता दिनांक 11/7/23पासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जमा होऊन त्या पाण्याच्या प्रवाहात सलोड् रस्त्याची दुर्गती तर झालीस त्याच बरोबर संदीप गिरी यांच्या घरासमोरील ते देवराव चौधरी यांच्या घरासमोरील रस्ता संपूर्ण रस्ता खरडून गेला असुन सदर पाहनिस खेड पिंपरी सरपंच मंगेश हंसराज कांबळे पटवारी निंगोट साहेब कृषी सहायक माहूरे साहेब आणि गावातील नागरिक हरिकेशव भारती बाबाराव कोडपे दिनेश भाऊ राहुल जाधव गिरी ईश्वर इटकरे गवरव चौधरी अमित चौधरी रोशन तट्टे प्रफुल शेळके गजानन शेळके देवराव चौधरी उपस्थित होते निदर्शनास असे आढळून आले की समृद्धी महामार्गावर मुरूम नेण्याकरिता खोदकाम नियोजन बद्ध न केल्यामुळे खेड पिंपरी गावाच्या दिशेने पाण्याचा मार्ग काढून दिल्याने गावामध्ये असणारे कसेबसे असणारे रस्ते खरडून वाहुन गेले असता सतत पाणी रस्त्यावर वाहत असल्याने येणे जाणे गावातील लोकांना मुश्किल झाले असून रत्यालगत असणाऱ्या घरामध्ये पाणी शिरून पडण्याचा भीतीने जनतेचा आक्रोश निर्माण झाला असुन समस्या निवारण करण्याकरिता खदाणीतील पाणी मार्ग गावाच्या विरुद्ध दिशेने काढून खरडून गेलेला रस्ता त्वरीत तयार करून देण्याकरिता निवेदन मा, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना सरपंच मंगेश कांबळे खेड पिंपरी गावकरी यांच्या तर्फे देण्यात आले.
Comments