नांदगाव खंडेश्वर येथील वादग्रस्त उपकार्यकारी अभियंता यांची अखेर बदली.

पद्माकर पाटील यांचे तडकाफडकी स्थानांतरण.

अजय पिंगे हे उपकार्यकारी अभियंता म्हणून रुजू.

उत्तम ब्राम्हणवाडे.

नांदगाव खंडेश्वर येथील विद्युत वितरण कंपनीचे वादग्रस्त उपकार्यकारी अभियंता पद्माकर पाटील यांचे अखेर तडकाफडकी स्थानांतरण करण्यात आले आहे आणि त्यांच्या जागी विद्युत कंपनीने अकोला परीमंडळ कार्यालयांचे अजय पिंगे यांची नियुक्ती केली आहे.
पद्माकर पाटील हे नांदगाव खंडेश्वर येथे वादग्रस्त उपकार्यकारी अभियंता ठरले होते त्यामुळे त्याच्या विरोधात दररोज वृत्त्तपत्रामध्ये बातम्या प्रकाशित होत होत्या त्या बातम्यांची विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन त्यांचे तडकाफडकी अमरावती परीमंडळ कार्यालयांत स्थानांतरण केले आहे आणि त्यांच्या जागी अजय पिंगे यांना रुजू होण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार अजय पिंगे यांनी आपला पदभार स्वीकारला असून यावेळी त्यांनी सांगितले की,आपल्या कार्यकाळात नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही तसेच वीज ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा कश्या पद्धतीने पुरविल्या जाईल याकडे आपण लक्ष देणार आहोत तसेच तालुक्यातील शेतकऱ्याच्या विद्युत विभागाशी संबंधित समस्या सोडविण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी नांदगाव खंडेश्वर येथील पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अजय पिंगे यांची सदि्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.आणि त्यांचेशी विविध विषयावर चर्चा सुद्धा केली.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात