मांजरी म्हसला केंद्राची सत्र २३/२४ ची पहिली शिक्षण परिषद संपन्न.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकपूर दादापूरचा उपक्रम.
उत्तम ब्राम्हणवाडे.
महिन्याला शिक्षण परिषद घेण्याचे नियोजन शासकीय परिपत्रकानुसार आहे. या सत्रातील जुलै महिन्याची मांजरी म्हसला केंद्राची पहिली शिक्षण परिषद नुकतीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकपूर दादापूर येथे संपन्न झाली.
या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी आदरणीय किरणजी पाटील सर होते तर मुख्य मार्गदर्शक म्हणून आदरणीय कल्पनाताई ठाकरे होत्या त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून किरण ढवळे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, गौतम गडलिंग ग्रामपंचायत सदस्य, अशोक बेरड आणि सुरज मंडे व्यासठावर विराजमान होते.
शिक्षण परिषदेमध्ये सर्वप्रथम वाकपुर शाळेच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिपाठ सादर केला. बदली प्रक्रिया 2022 मध्ये मांजरी म्हसला केंद्रामधून इतर ठिकाणी बदलून गेलेल्या सर्व शिक्षकांना पहिल्या शिक्षण परिषदमधे आमंत्रित करण्यात आले होते. त्यामधे प्रामुख्याने किरण पाटील, जयश्री भोपळे, जितेंद्र यावले, संदीप झाडे, मनीष अवघड आदी शिक्षकांना प्रेमपूर्वक प्रत्येकी एक वृक्ष व एक पुस्तक देऊन केंद्रातर्फे सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे मांजरी म्ह.केंद्रात नव्याने विविध शाळेवर रुजू झालेल्या दीपिका अर्बाळ, सुनीता लोणकर, स्वाती पोकळे, राजेंद्र देशमुख, जितेंद्र यावले, शिवहरी मुघल, विजय चव्हाण आदी सर्व शिक्षकांचा गुलाबाचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. तसेच केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांचे स्वागत करण्यात आले. बदलीने इतर प.स. मधे रुजू झालेल्या किरण पाटील, जितेंद्र यावले, संदीप झाडे, जयश्री भोपळे यांनी यथोचित आपले मनोगत व्यक्त केले. आपापल्या शाळेबद्दलच्या व सहकाऱ्यांच्या जुन्या गोड आठवणीनां तसेच नांदगाव पंच्यायत समिती आणि, मांजरी म्ह. केंद्र व केंद्राच्या केंद्रप्रमुख कल्पनाताई ठाकरे मॅडम यांचेसह सेवाकाळातील विविध प्रसंगाचे अनुभवकथन आपल्या मनोगत मधे पाहुण्यांनी व्यक्त केले. मनोगतानंतर पाहुण्यांचे हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. मध्यंतरी स्नेहभोजनचा आनंद घेण्यात आल्यानंतर आदरणीय केंद्रप्रमुख कल्पनाताई ठाकरे यांनी शिक्षण परिषदेच्या दुसऱ्या सत्रामधे प्रामुख्याने अध्ययन स्तरणिश्चीती, सेतू अभ्यासक्रमाचे महत्त्व, NCF, पालक सभा इत्यादी बाबींचा आढावा घेऊन त्यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री. सुरज मंडे यांनी विद्या समीक्षा केंद्र (vsk) बाबत भूमिका व महत्त्व आणि swiftchat app याबाबत शिक्षण परिषदमधे माहिती दिली.
शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेकरिता केंद्रातील सर्वश्री रवी गजभिये, कमलाकर कदम, संजय नेवारे, अनिल देशमुख, मनोज भांदर्गे, सुनीता लोणकर, हेमलता भिमटे, मुख्याध्यापक तसेच प्रशांत सापाने, जितेंद्र यावले, गजानन होळकर, सतीश डोंगरे, गजानन वाकें, राजेंद्र काळे, सुषमा गिरी, रेखा बोकडे, प्रेरणा पेठे, किशोर गणवीर, पवन मसराम, अनिता जोशी, ज्योती जगताप, अर्चना सरोदे, ज्योती देशमुख, उमेश ठाकरे, अर्चना बैतूले, प्रणिता मनगुळे, राखी सरोदे, धनाजी चव्हाण, अजय गावंडे, विजय चव्हाण, रंजना गडलिंग, रामेश्वर गडलिंग, राहुल आकोडे, यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments