एस.टी.कंडक्टरला युवकांची मारहाण.
चिल्लर पैश्यावरुन पेटला वाद.
नांदगाव खंडेश्वर बसस्थानकावरील घटना.
उत्तम ब्राम्हणवाडे.
दि.15 / 07 / 23 रोजी अमरावती येथील राजापेठ आगारातून एस.टी.महामंडळाची बस यवतमाळ येथे जात असताना नवाथे चौका जवळ एसटी वाहक संजय नामदेव श्रीराव वय (40 वर्ष ) यांनी प्रवाशांना तिकीट काढून द्यायला सुरूवात केली असता एस.टी.बसमध्ये एका सीटवर नांदगाव खंडेश्वर येथील प्रवाशी अब्दुल जुनेद व त्याची पत्नी यांना तिकीट काढून दिल्यावर तिकिटाचे पैसे मागितले आरोपीने वाहकाला चिल्लर पैसे न देता पाचशे रुपयाची नोट दिली मात्र वाहका जवळ चिल्लर पैसे परत देण्यासाठी नसल्याने चिल्लर पैश्याची मागणी केली मात्र आरोपी यांने चिल्लर पैसे रखना तेरा धंधा है अश्या उद्धट शाब्दिक वाद वाढवून रुक तू नांदगांव आने दे फिर बताता हूं अशी धमकी देऊन नांदगांव येईपर्यंत गप्प बसला मात्र नांदगांव खंडेश्वर येथील बसस्थानक परिसरात दिं.15/7/23 रोजी सायं.6.30 वाजताच्या दरम्यान एस.टी.बस येताच आरोपीचा भाऊ अब्दुल निसार वय(40 वर्ष) आणि अन्य 8 मुस्लिम आरोपींनी बसमध्ये चढून वाहक संजय श्रीराव यांना शिवीगाळ करुन जबर मारहाण केली जास्त वाद वाढू नये म्हणून एसटी चालक श्रीकृष्ण वानखडे यांनी बस सरळ नांदगांव पोलीस स्टेशन येथे नेऊन लावली घटनेची माहिती वाहक यांनी पोलीस स्टेशन येथे देऊन तक्रार नोंदवली असता आरोपी अब्दुल जुनेद वय ( 48 वर्ष ) रा.फुबगांव.ता. नांदगाव खंडेश्वर,अब्दुल निसार वय (40 वर्ष ) रा.फुबगांव ता.नांदगाव खंडेश्वर व अन्य 8 अनोळखी युवकावर भा.द.वी.चे कलम 353, 332,143,147,149,506 अंतर्गत गुन्हे दाखल करून सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास ठाणेदार विशाल पोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे.
Comments