प्रिंटिंग व्यवसायाला उतरती कळा.

लग्नपत्रिका छपाईचे प्रमाण घटले

ऑनलाईन निमंत्रणाकडे कल.

उत्तम ब्राम्हणवाडे.

 काळ बदलला तसे लग्नाचे आमंत्रण प्रत्यक्ष देण्याऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून देणे सोयीस्कर पडत असून, आता ई- वेडिंग कार्डचा वापर करून फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाद्वारे आमंत्रणे देण्यात येत आहे. मात्र, यामुळे प्रिंटिंग प्रेस व्यावसायाला उतरती कळा लागली आहे.
उन्हाळ्यात लग्नसराईत फक्त पत्रिकेच्या माध्यमातून लाखोंची कमाई व्हायची. आता मात्र लग्नपत्रिका छापण्याऐवजी केवळ पत्रिकेची डिझाइन तयार करून घेण्याचा प्रकार वाढला आहे. दरम्यान, कोरोना निर्बंधा पासून घरोघरी पत्रिका वाटण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे लग्नाचे आमंत्रण हे सोशल मीडियाद्वारे देण्याकडे कल वाढला आहे.सध्या इंटरनेटचे युग असून यामुळे नागरिकांचे ऑनलाइन व्यवहार वाढले आहेत. 
पूर्वी दुकानदारांसाठी लागणारी बिल बुक, खाते बुक व इतरही साहित्य प्रिंटिंगवाल्यांकडून घेतले जात होते. मात्र, बहुतांश व्यापारी हे संगणकावर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दैनंदिन व्यवहार पूर्ण करत आहेत. पूर्वी उन्हाळ्यात लग्नसराईच्या काळात  लाखो रुपये कमाई नुसत्या पत्रिका छपाईतून व्हायची.
                 
 कागद,शाईच्या किमतीतही दुप्पट वाढ.

वेगवेगळ्या प्रिंटिंगसाठी लागणाऱ्या कागदाच्या किमतीतही ६० टक्क्यांनी वाढ झाली. प्रिंटिंगसाठी लागणारी शाई २२० रुपयांवरून साडेचारशे रुपये म्हणजेच दरात दुप्पट वाढ झाली आहे.वन फोम कागदाचा रिम १६० वरून २६० रुपये झाला आहे. प्रिंटिंग व्यवसायात लागणारे कागद, शाई व साहित्य महागले आहे. मात्र, छपाईची मागणी कमी झाली आहे.
 -प्रकाश दैत
 प्रिंटर्स व्यवसायीक ,नांदगाव खंडेश्वर.
               
ऑनलाईन मुळे व्यवसाय मर्यादित.

ऑनलाइन व्यवहार, सोशल मीडियामुळे प्रिंटिंग व्यवसाय मर्यादित झाला आहे. मागील पाच वर्षांपासून छपाईवर परिणाम झाला आहे.लग्नपत्रिका आता मोबाइल, सोशल मीडियाद्वारे टाकल्या जातात व हे निमंत्रण लोकांना मान्य असल्याने वेळ व पैसा दोन्ही वाचतो.

माधव ढोके
प्रिंटर्स व्यवसायिक,नांदगाव खंडेश्वर.

Comments

Anonymous said…
ही अगदी ज्वलंत समस्या प्रिंट मेडिया समोर भेडसावत आहे,on line मुले सेकंदात पेपर हाती येतो पेपर ला वाटण्याकरिता पेपर ची किंमतच मोजावी लागत असेल ,प्रिंट मीडिया डब घाईस लागल्यास नवल वाटणार नाही,ब्राम्हणवाडे हे नेहमी ज्वलंत समस्येवर नेहमी लिखाण करतात खूप धन्यवाद!

Popular posts from this blog

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

बडनेरा-अंजनगाव बारी-गोळेेगाव बस बंद प्रवासी नागरिक त्रस्त.

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !