अन...डॉक्टरांनी काढल्या म्हशीच्या पोटातुन काढल्या प्लास्टिक व अन्य वस्तू.
पशुवैद्यकीय डॉक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया.
शेतकऱ्याने मानले आभार.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर येथील तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात शहरतीलच रहिवासी असलेले नाजिम अक्रम यांच्या म्हशीचे पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांनी ऑपरेशन करून त्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या व अन्य वस्तू तिच्या पोटातून काढण्यात आल्या म्हशीचे 4 ते 5 दिवसापासून पोट फुगलेले होते त्यांनी बाहेरील इलाज करूनसुद्धा काहीच फायदा झाला नसल्याने त्यांची म्हैस मरण्याच्या अवस्थेत होती. त्यामुळे त्यानी आपली म्हेस येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचाराकरिता नेली त्यानंतर डॉ.अतुल खेरडे यांचे मार्गदर्शन घेऊन त्या म्हशीचे ऑपरेशन करण्यात आले असता तिच्या पोटामध्ये प्लास्टिकच्यावस्तू व प्लास्टिक पिशव्या इत्यादी काढन्यात आल्या तब्बल अडीच तासानंतर वैद्यकीय डॉक्टरांच्या चमुने ऑपरेशन यशस्वी केले.त्यामुळे नाजीम अक्रम यांच्या म्हशीचे जीव वाचले या ऑपरेशन मध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यातील इतर डॉ. सचिन भडके, व्ही.बी.राठोड, अनिल गवळी,पंकज पवार यांनीसुद्धा सहकार्य केले.आणि हे ऑपरेशन यशस्वी करण्यात आले. बदलत्या ऋतूनुसार जनावरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवतात. आणि जनावरे ही पोटभर अन्न मिळत नसल्याने बाहेर मिळेल ते पदार्थ खाऊन आपले पोट भरतात त्यामुळे ते प्लास्टिक पिशव्या सुद्धा खातात आणि पोट फुगुन मरण पावतात त्यामुळे नागरिकांनी सुद्धा जनावरांना प्लास्टिक पिशवीमध्ये अन्न पदार्थ खायला देऊ नये असे आवाहन नागरिकांना पशुवैद्यकीय विभागाकडून आव्हान करण्यात आले आहे.आपल्या जनावराचे प्राण वाचविण्यात आल्याने नाजीम अक्रम यांनी पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहे.
Comments