डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यावर डाक तिकीट काढा हर्षवर्धन देशमुखांनी घेतली गडकरींची भेट.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यावर डाक तिकीट काढा हर्षवर्धन देशमुखांनी घेतली गडकरींची भेट.
अमरावती.
स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक, कृषिरत्न, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त डाक तिकीट काढण्यात यावे, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
नितीन गडकरी हे शुक्रवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे आले असता त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. भाऊसाहेबांच्या जयंती वर्षात 1999 मध्ये भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट काढले होते. त्यामुळे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ डाक तिकीट
काढण्यात यावे, अशी मागणी श्री शिवाजी शिक्षण संस्थेने या पूर्वीच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना केली होती. या प्रस्तावाचा गडकरी यांनी पाठपुरावा केल्याबद्दल या भेटीत त्यांचे आभारदेखील मानण्यात आले. या बैठकीत संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाबाबतच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येऊन निवेदन देण्यात आले. या भेटीप्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, उपाध्यक्ष अॅड. जे. व्ही. पाटील, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, प्रा. सुभाष बनसोड, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. पद्माकर सोमवंशी आदी उपस्थित होते.
Comments