टाकळी कानडा गावात स्मशानभूमी बांधकामांसाठी निधी द्या!
माजी सरपंच सुशील थोरात यांची मागणी.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गट ग्रामपंचायत धानोरा फसी अंतर्गत येणाऱ्या टाकळी कानडा गावात कित्येक वर्षांपासून स्मशानभूमी शेड नसल्याने अंत्यविधी कार्यक्रमासाठी अनेक अडचणी निर्माण होतात त्यासाठी प्रशासनाने जनसुविधा योजनेतून त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सुशील थोरात यांनी केली आहे.धानोरा फसी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या टाकळी कानडा येथे स्मशानभूमी शेड निर्माण करण्या करिता जनसुविधा योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी ३० ऑगस्ट २०१७, ७ सप्टेंबर २०१७ रोजी पालकमंत्री जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव निवेदन सादर केले दिनांक २८ जुलै २०२३ ला सुध्दा मा.जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले असून अनेकदा पाठपुरावा करून सुध्दा अद्यापपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही ग्रामस्थांना अंत्ययात्रेला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते त्यामुळे सदर गंभीर समस्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने स्मशानभूमी बांधकामाकरीता त्वरित निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी माजी सरपंच सुशील थोरात यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.
Comments