हूकुमशाही विरोधात माझा विजय.
अभिजीत ढेपे यांचे प्रतिपादन.
कृषी उत्पन्न बाजार समिती कडून सत्कार समारंभाचे आयोजन.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर येथील श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनियुक्त उपाध्यक्ष झाल्याबद्दल सहकार नेते अभिजीत ढेपे यांच्या भव्य अश्या सत्कार समारंभाचे आयोजन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरीक हनुमंत जळीत हे होते.अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभात ढेपे,उपसभापती विलास सावदेयांचेसह विविध पक्षांचे नेते मंडळी उपस्थित होते.यावेळी सत्कारमूर्ती अभिजीत ढेपे यांचा भव्य अश्या पुष्पहाराने त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी सत्काराला उत्तर देताना अभिजीत ढेपे म्हणाले की,जिल्हा मध्यवर्ती बँकेत मी ही प्रस्थापिता विरुद्ध लढाई लढलो असून मी सर्वांना सोबत घेऊन हुकूम शाहीचा अंत केला आहे आणि हे सर्व तुमच्या आशीर्वादानेच शक्य झाले आहे मला यापुढेसुद्धा तुमच्या आशीर्वादाची गरज आहे त्यामुळेच आपण भविष्यातक्रांती घडवून आणणार आहोत तुमच्या सत्कारामुळे मी भारावून गेलो असून त्यातून मी कधीही उतराई होणार नाही आणि तुमचे ऋण कधीही विसरणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विलास मारोटकर यांनी तर आभार प्रदर्शन बाजार समितीचे उपसभापती विलास सावदे यांनी केले यावेळी मंचावर सर्वर्श्री प्रमोद ठाकरे, बाळासाहेब भागवत, बाळासाहेब राणे,संजय कणसे, गजानन मेटकर, राजेन्द्र पांडे, ओकांर ठाकरे,घनश्याम सारडा, राजेश पाठक,विलास चोपडे, श्याम राऊत, ज्ञानेश्वर हांडे, संदीप कनसे, पुरुषोत्तम बनसोड, गजानन खोडे, राहुल वनवे,वसंत मानके, मनोज जांगडा,विवेक वैष्णव, मो.साजिद धनंजय मेटकर, गजानन ढोक, संजय देवतळे,नंदु देशमुख ,गजानन ढेरे,पंकज ठाकरे बाळा रोहणकर, योगिराज परळीकर यांचेसह विविध पक्षांचे नेते मंडळी उपस्थित होती.
Comments