धानोरा (फसी) जि.प. शाळेतील वर्ग खोल्या शिकस्त . तत्काळ दुरुस्तीची मागणी


 75 विद्यार्थ्यांना शिकवतात फक्त 3 शिक्षक

 उत्तम ब्राम्हणवाडे

  नांदगाव खंडेश्वर तालुक्‍यातील धानोरा (फशी) हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून येथे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषदची शाळा आहे. सदर शाळेची इमारत अतिशय जुनी असून शाळेतील काही वर्गखोल्या जुन्या आहेत.आणि त्या अत्यंत.
  जीर्ण झाल्या असून कधीही पडू शकतात . या खोल्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी गावकरी यांनी प्रशासनाकडे केली आहे. शासन शिक्षणाबाबत अत्यंत संवेदनशील असून ग्रामीण भागातील मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी धोरणात्मक कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. मात्र येथील शाळेकडे कोणाचेच लक्ष नसल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारद्वारे
 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, मोफत भोजन, गणवेश पुस्तके आदींचे वाटप केले जाते. मात्र धानोरा फसी येथील विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेकडे प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे. ग्रामीण भागात शाळांचे बांधकाम प्राचीन काळापासून सुरू असल्याने सध्याचे बांधकाम निकामी झाले आहे.

पावसाळ्यात शाळेचे छतावरून पाणी गळते आणि भिंतींना तडे गेले आहेत अशा जीवघेण्या परिस्थितीत विद्यार्थी अभ्यास कसा करतील? हा मोठा प्रश्न आहे. अनेकवेळा नागरिकांच्या मागणीनंतरही प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
 या शाळेत 75 विद्यार्थी असून त्यांना फक्त 3 शिक्षक शिकवितात परंतु येथे 6 शिक्षकांची नितात आवश्यकता आहे.

नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीच्या शिक्षण विभागा कडून
तालुक्यातील सर्व शाळांच्या मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचा अहवाल मागविण्यात आला होता.
या अहवालानुसार धानोरा फसीतील जीर्ण वर्ग खोलीबाबत मुख्याध्यापकांनी प्रस्ताव पाठवला आहे, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने याबाबत आमचा पाठपुरावा सुरू आहे.

  प्रवीण मेहरे
  केंद्रप्रमुख, जिल्हा परिषद शाळा, धानोरा फशी
 

जिल्हा परिषद शाळा जीर्ण झाली असून 
येथे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून अभ्यास करावा
लागतो त्यामुळे
विद्यार्थ्यांना शिक्षणात अनेक अडथळे येत आहेत. पाऊस पडल्यानंतर वर्गात पाणी साचते.
एकीकडे जनतेच्या पैशातून लाखो रुपये खर्च करून राजकारण्यांची मोठमोठी हॉल आणि फार्म हाऊस बांधली जातात, मात्र दुसरीकडे शिक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे सरकार आणि राजकारण्यांचे दुर्लक्ष आहे.
  तर, विद्यार्थी कसा अभ्यास करतील आणि काय शिकतील? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
 सुशील थोरात
 माजी सरपंच जि.प.धानोरा फशी

 
जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींना डी-लिस्ट करण्याचे काम सुरू आहे. रक्कम जास्त असल्याने कोणीही लिलाव घेण्यास तयार नाही. त्यामुळे या प्रक्रियेत थोडा विलंब होत आहे. जुन्या इमारती पाडून नवीन बांधण्याच्या प्रक्रियेवर सरकार फेरविचार करेल, अशी अपेक्षा आहे.

  प्रमिला शेंडे
  गटशिक्षण अधिकारी
  पंचायत समिती, नांदगाव खंडेश्वर

 

Comments

Anonymous said…
नांदगाव खंडेश्वर तालुका विकासात्मक बाबतीत संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये माघारलेला आहे कदाचित तालुक्यातील राजकीय नेत्यांची ईच्छाशक्ती कमी पडत असावी,आपण तन्मयतेने तालुक्यातील समस्या मीडियाच्या माध्यमातून मांडता, शासणाला अवगत करता ते अभिनंदनीय आहे.

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात