मंगरूळ चवाळा येथे सैनिकांच्या सन्मानार्थ शिलान्यास व वृक्षारोपण सोहळा.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्ती निमित्त आयोजन.
विविध उपक्रम करण्यात आले साजरे.
उत्तम ब्राम्हणवाडे
भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त होवून 75 वर्षे पूर्ण झाल्याने संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने विविध उपक्रम व कार्यक्रम राबविले जात आहे.
भारत सरकारच्या निर्देशानुसार प्रत्येक ग्रामपंचायत ने दर्शनी भागात सिमेवरील सैनिकांच्या सन्मानार्थ गावातील सेवानिवृत्त सैनिकांच्या हस्ते शिलान्यास करण्याचे व 75 देशी वृक्षांची लागवड करण्याचे आवाहन केले आहे. मंगरूळ चवाळा ग्रामपंचायत मार्फत जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच प्राथमिक शाळेच्या सहकार्याने दर्शनी भागात येत असलेल्या जि.प. प्राथमिक शाळेच्या वॉल कंपाऊंड वर सैनिकांच्या सन्मानार्थ कायमस्वरूपी शिलान्यास फलकाचे अनावरण करण्यात आले.
त्याचप्रमाणे पर्यावरणीय समतोल राखला जावा यासाठी सद्या नितांत आवश्यक असलेल्या वृक्ष लागवडीच्या आवाहनाला सुद्धा प्रतिसाद देत प्राथमिक आरोग्य केंद्र येथील अमृत वाटिकेमध्ये 75 देशी वृक्षांची एकाच वेळी लागवड करण्यात आली.
या सर्व कार्यक्रमाचे ड्रोन कॅमेरा ने फोटो व व्हिडिओ टिपण्यात आले. सदर कार्यक्रमाला सेवानिवृत्त सैनिक पंजाबराव वैद्य, गजानन ठवकर, गटविकास अधिकारी नाटकर साहेब, ठाणेदार प्रकाश तायडे साहेब, सरपंच निलेशभाऊ निंबर्ते, उपसरपंच शोभाताई चवाळे,
ग्रामसेवक रतिभान रबडे, जि.प. हायस्कूल चे प्राचार्य अजयकुमार कोळी सर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेश तितरे सर, बाळासाहेब राणे, अतुलभाऊ ठाकुर, राजेश पारधी, लक्ष्मीताई खांडेकर, अश्विनीताई चवाळे, सविताताई झोपाटे, ईश्वरभाऊ टेवरे, रोजगार सेवक उमेशभाऊ गावनेर, अमोल झोपाटे, पंचायत समिती मधील अधिकारी, कर्मचारी, सर्व शिक्षकवृंद, आशासेविका, बचत गटातील महिला, ग्रामपंचायत कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी, गावकरी उपस्थित होते.
Comments