महापुरुषांचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडे याला अटक करा.
सभा आयोजकावर गुन्हे दाखल करा.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी.
तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.
उत्तम ब्राम्हणवाडे.
सतत वादग्रस्त वक्तव्य करून समाजात व्देष - अराजक निर्माण करणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे याला त्वरीत अटक करूत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा व भिडेचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तहसिलदार नांदगांव खंडे यांचे मार्फत मा . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला निवेदनाद्वारे केली आहे. पक्षाचे वतीने दि . २ ऑगस्ट रोजी महात्मा गांधी , महात्मा फुले , गौतम बुद्ध , राजाराम मोहन रॉय ,भारतीय संविधान , भारतीय ध्वज , राष्ट्रगित याबाबत अत्यंत आक्षेपार्य वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे विरोधात राज्यव्यापी निषेध आंदोलन करण्यात आले . नांदगांव मध्ये पक्षाच्या तालुका शाखेच्या वतीने बस स्टँड चौकात तीव्र निषेध करण्यात आला.भिडे विरोधात जोरदार घोषणा देवून कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला . संभाजी भिडे हा समाजा मध्ये जाणतेपणे विषाची पेरणी करीत आहे . हिंदू राष्ट्राच्या नावाखाली ब्राम्हणी मनुवादी सनातनी व्देषमुलक विचार येथील बहुजन तरुणांच्या डोक्यात पेरून भिडे भारतीय समाजाचा बहुआयामी विविधतेने नटलेला सांस्कृतिक पाया नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे . यांचे मागे राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही . महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य यांना नाकारायचे आहे , याचा अर्थ येथील वंचित बहुजन ओबीसी समाज शिक्षण घेत आहे हेच या सनातनी लोकांना मान्य नाही . मणिपूर मधील आदिवासी स्त्रियांवर झालेल्या अत्याचारांचा घटना उजेडात येवून समाजमन ढवळून निघून सर्वत्र मणिपूर राज्य सरकार व केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त होत असतांनाच या गंभीर विषयावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपने भिडे सारख्या सडक्या आंब्याला समाजात विष पेरण्यासाठी खुली सुट दिल्याचे मत यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.देशाचा मान असलेला तिरंगा ध्वज , जनगणमन हे आपले राष्ट्रगीत व भारतीय संविधाना विरोधात भिडे जनतेला चितावणी देण्याचे काम आपल्या भाषणामधून करीत असल्यामूळे याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरीत अटक करण्याची मागणी भाकपने केली आहे. निषेध आंदोलन व निवेदन देतेवेळी पक्षाचे जिल्हा सचिव कॉ . सुनिल मेटकर , तालुका सचिव कॉ .संतोष सुरजुसे, कॉ.विनोद तरेकर , कृ .उ. बा . समीतीचे संचालक कॉ ओमप्रकाश सावळे , कॉ . संजय मंडवधरे , भारतीय महिला फेडरेशनच्या जिल्हा सचिव कॉ. चित्राताई वंजारी , जयाताई मंडवधरे सोनाली वैदय , सुनंदाताई ढोके , मिनाताई वैदय ,कॉ . हरिदास राजागीरे , समशेर खाँ पठण , माधव ढोके , रामदास गायधने ,अनिल मासुतकर , हरिदास देशमुख , योगेश कणसे अविनाश कणसे , बाबाराव इंगळे , अक्षय भगवे , चंदू मेहेंगे , किशोर ढवळे , वसंत मंडवधरे वैभव जांभळे सह कार्यकर्ते हजर होते .
Comments