वाढत्या खर्चाने शेतकरी होत आहे हतबल !

शेतकरी बारा महिने करतो शेतात काबाड कष्ट.
महागाईमुळे शेती करणे झाले अवघड.

उत्तम ब्राम्हणवाडे 

बळीराजा बारा महिने शेतीमध्ये काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करीत असतो. मात्र, महागाई वाढल्याने शेती न परवडण्यापलीकडे गेली आहे. सध्या खरीप हंगामातील पिके जोमात असून, वातावरणातील बदलामुळे त्यांच्यावर विविध अळ्यानी हल्ला केला आहे. त्यातच रासायनिक खतांसह कीटकनाशक, तणनाशकांच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल होत आहे.
कोणत्याही उत्पन्नाची अपेक्षा न करता बळीराजा शेती कसत असतो. मात्र, दिवसेंदिवसखत, तणनाशके, कीटकनाशकांच्या 
दरवर्षी कोणत्याही उत्पन्नाची अपेक्षा न करता बळीराजा शेती कसत असतो. मात्र, दिवसेंदिवस किमतीत वाढ होत आहे. तसेच मजुरांची दरवाढ झाली असून उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडत आहे. त्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला महागाईच्या तुलनेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. त्यामुळे शेती करायची की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.गेल्या काही वर्षामध्ये शेतमजुरांच्या टंचाई असल्यामुळे शेतकरी नाइलाजाने तणनाशका कडे वळला आहे.पावसाळ्यात तणांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. यामुळे खरीप हंगामात तणनाशकांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. 
खरीप हंगामातील पिकांचा कालावधी
हा कमी असतो. कमी कालावधीत शेतकऱ्यांना उत्पादन घ्यावे लागते. यामुळे खरीप पिकांना खताची मात्रा
दिल्याशिवाय अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. नशिबाने साथदिली आणि उत्पन्न चांगले झाले तरीही बाजारात योग्य भाव मिळेल, याचीसुध्दा शाश्वती नसते. बाजारात खत, तण, कीटकनाशकाच्या किमती वाढल्या तरी रासायनिक खताला पर्याय नाही. 
यामुळे शेतकरी मिळेल त्या दरात खत खरेदी करीत आहेत. खरीप हंगामात कीडरोगांचा प्रादुर्भाव असल्याने रासायनिक औषधांचा वापर केला जातो.वर्षभरापासून रासायनिक खतांच्या किमतीमध्ये सतत वाढ सुरू आहे. खतांबरोबरच आता फवारणीसाठी लागणाऱ्या औषधांचे दर देखील दुप्पट झाले आहेत. शेतात पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. मजुरीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना काम करण्यासाठी मजूर लावणेही कठीण झाले आहे. त्यामुळे यापुढे शेती करणेसुद्धा कठीण झाले आहे. खत, कीटकनाशक, तणनाशकाच्या किमतींवर नियंत्रण नसल्याने शेती परवडत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. सद्यस्थितीत शेतकरी आर्थिक संकटातून जात असला तरी पर्याय नसल्याने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना शेती करावी लागत आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात