पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्या हल्लेखोरांना अटक करा.


 हल्लेखोर आणि आ.किशोर पाटील यांच्यावर कार्यवाही करा.

पॉवर ऑफ मीडियाचे तहसीलदारांना निवेदन सादर

उत्तम ब्राम्हणवाडे

 पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांचेवर काही गुंडांनी हल्ला करून त्यांना जखमी केले आहे आणि हा हल्ला तेथील स्थानिक आमदार किशोर पाटील यांच्या सांगण्यावरून करण्यात आलेला असल्याने हा लोकशाहीच्या चौथा स्तंभावर हल्ला आहे.
 त्यामुळे हा अन्याय आम्ही कदापिही सहन करणार नाही  आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो. त्यामुळे पत्रकार संदीप महाजन यांचेवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी.

तसेच ज्यांच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आला ते स्थानिक आमदार किशोर पाटील यांचेवर सुद्धा गुन्हे दाखल करून त्यांना अपात्र ठरविण्यात यावे.
 अन्यथा  पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन  छेडण्याचा इशारा राज्याचे गृहमत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात देण्यात आला असून हे निवेदन नांदगाव खंडेश्वर येथील निवासी तहसीलदार बबन राठोड यांचेमार्फत पाठविण्यात आले.

 सदर निवेदन पॉवर ऑफ मीडियाचे अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे यांचे नेतृत्वात तालुका अध्यक्ष श्रीपाल सहारे सचिव पवन ठाकरे, निकेत ठाकरे,प्रशांत झोपाटे,अरुण बनकर,सागर गावनेर,अनिकेत शिरभाते,गजानन भस्मे,नितेश कानबाले,सूरज सहारे,संदेश ढोके,योगेश राऊत,अंकुश निमनेकर, प्रदीप रघुते, यांचे उपस्थितीत देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात