जिल्हा परिषद शाळेमध्ये सात वर्गाला शिकवनिकरिता चार शिक्षक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात.
जिल्हाधिकारी साहेबांना सरपंच यांनी दिले निवेदन.
उत्तम ब्राम्हणवाडे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असुन जी परीषद शाळेमध्ये सद्या हि परीस्थिती आहे की सात वर्गाला शिकवणी कण्यास फक्त चार शिक्षक शासनाने नियुक्त केले आहे, त्याच शिक्षकांमध्ये निवडणूक विभागाने सुधा कामे लाऊन दीले आहे,शिकवणी करीता शिक्षक पुरेसे नसल्यामुळे जी परिषद शाळेमध्ये योग्य ते शिक्षणापासून वंचित राहून ग्रामीण भागातील विद्यार्थी एक प्रकारचा शासनातरफे व राजकीय नेते यांनी दुर्लक्ष्य केल्या मुळे जी परीषद शाळेची दैंनदिन परीस्थिती झाली आहे.
कारण आज सरकारी अधिकारी कर्मचारी किंवा राजकीय नेत्यांचे विद्यार्थी मुले हे प्रायव्हेट शाळेतच प्रवेश घेतात मग जिल्हा परिषदेच्या शाळेला प्रवेश गरीब वर्गातील विद्यार्थी घेतात,त्यांना अपुरे शिक्षक अपुरे वर्गखोल्या असल्यामुळे शिक्षण शेत्रात अन्याय होत आहे व विर्थ्यांचा शिक्षण दर्जा घसरला आहे , हि परिस्थिती नांदगाव खंडेश्वर तालुक्या मध्ये खेड पिंपरी सरपंच मा ,मंगेश हंसराज कांबळे पिंपरी निपाणी येथील सरपंच मा, विषलभाऊ रिठे पाळा गावचे सरपंच मा पांकजभाऊ मेटे यांनी विषयाला गंभीर समजून जिल्हाधिकारी साहेब सौरव कटियार यांची प्रेतेक्ष भेट घेऊन चर्चा करण्यात आली व सुशिक्षित बेरोजगार शिक्षक भरती ग्रामसभा माध्यमातून करून त्यांना मानधन निधी उपलब्ध करून देण्यात यावा व वर्ग खोल्या तयार करून द्याव्या करीता निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना नांदगाव खडेश्वर सरपंच संघटने तर्फे देण्यात आले,विशेष लक्ष देऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी साहेबांनी संघटनेला दिले असून त्याच बरोबर नवनियुक्त जिल्हाधिकारी मनून नेमणूक झाल्याबद्दल फुलांचा गुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन सर्व सरपंच वतीने करण्यात आले,
Comments