पिंपळगांव (निपाणी) येथे भर पावसाळयात पाणी टंचाई ?
स्थानिक प्रशासन झोपेत !
ग्रामपंचायत सदस्य संदेश ढोके यांनी दिला आंदोलनाचा इशारा.
उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पिंपळगाव निपाणी येथे पावसाळा सुरु होऊन २ महिने झाले व सर्वत्र पावसाची संततधार सुरु आहे.व सर्वत्र पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली.
परंतु पिंपळगाव (निपाणी) येथे गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून नळयोजनेचा पाणी पुरवठा बंद असून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असूनही पाणी पुरवठा का बंद केला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्राम पंचायत सदस्य संदेश ढोके यांनी पाणी प्रश्ना बाबत ग्रामपंचायत सचिव विशाल मनोहरे व सरपंच सिंधू गजभिये यांना विचारणा केली असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.
यावरून असे लक्षात येते की,स्थानिक प्रशासन झोपेत असून गावच्या पाणी प्रश्नावर ढिम्म असल्याचे चित्र दिसून येत आहे.त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.पावसाळ्यात अनेक साथीचे रोग थैमान घालतात.त्यामुळे दूषित पाणी पिल्याने साथीचे रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे त्वरित लक्ष देऊन पाणी पुरवठा नियमित करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Comments