अखेर.... पिंपळगाव (निपाणी) येथील प्रशासनाला आली जाग !
नळयोजनेचा पाणी पुरवठा नियमित !
ग्राम पंचायत प्रशासन झाले खडबळून जागे
उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे भर पावसाळ्यात पाणी टंचाई या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करताच त्या बातमीच्या दणक्याने प्रशासन कामाला लागलं.
मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असूनही सरपंच यांनी जाणीवपूर्वक ही नळयोजना बंद केली होती का ? असा प्रश्न पिंपळगाव वासी विचारात आहे. कारण पाईपलाईन लिकेज होती तर सरपंच यांनी पाईप लिकेज दुरुस्तीसाठी पंधरा दिवस का लावले.
हा प्रश्न निरुत्तर आहे.मात्र याबाबत वृत्त प्रकाशित होताच पिंपळगाव (निपाणी) येथील ग्राम पंचायत प्रशासन खडबडून जागे झालं.
व पाणीपुरवठ्याची लिकेज असलेली पाईपलाईन त्वरीत दुरुस्त करण्यात आली. व पाणीपुरवठा नियमित करण्यात आला. त्यामुळे गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला.
पिंपळगाव निपाणी येथील नळयोजनेचा पाणी पुरवठा सुरळीत चालू झाल्याने गावातील नागरिकांनी ग्राम पंचायत सदस्य संदेश ढोके यांचे आभार मानले व गावच्या विकासासाठी अशा कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्वाची आज खरी गरज आहे अशा शब्दात संदेश ढोके यांचे कौतुक गावकऱ्यांनी केले.
Comments