पिंपरी (निपाणी) ग्रा. प मध्ये शहीद शिलाफलकाचे अनावरण.
गावात झाले 200 झाडांचे रोपन.
विराना करण्यात आले नमन.
उत्तम ब्राम्हणवाडे
आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचे समारोपीय उपक्रमांतर्गत मेरी मिट्टी मेरा देश अभियान ग्रामपंचायत पिंपरी (निपाणी) मध्ये राबविण्यात आला त्यामध्ये शिलाफलक लावून मातृभूमीच्या स्वतंत्रता आणि तिचा गौरव यांच्या संरक्षणाकरिता बलिदान दिलेला वीरांना शतशः नमन करण्यात आले.
त्याचबरोबर गावामध्ये गावातील लोकांनी विद्यार्थ्यांनी 75 मिनिटांमध्ये दोनशे वृक्षारोपण फळझाड लागवड केली त्याचबरोबर हातामध्ये दिवे घेऊन पंचपान शपथ गावातील लोकांनी घेतली हर घर तिरंगा अंतर्गत गावातील सर्व घरावर शासकीय इमारतीवर ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी गावातील सरपंच योगिता विशाल रिठे,उपसरपंच पुष्पा राजू प्रगणे ग्रामपंचायत सदस्य दीपिका किशोर रिठेपुष्पा रमेश रिठे सुजाता प्रदीप डोंगरे प्रतीक ज्ञानेश्वर रिठे गणेश उखडराव धामणे विक्रम मोतीराम पिसे ग्रामसेवक तलाठी सोनोने, कोतवाल आशिष ढोमने
माजी सरपंच विशाल रिठे crp मनीषा शाम कडू आशा वर्कर सुचिता धामणे अंगणवाडी मदत निस तेजस्विनी वानखडे शाळेतील मुख्याध्यापक बोडे सर पवार सर व शिक्षक वृद गावातील महिला व पुरुष मंडळी व विद्यार्थी मोट्या संख्येने उपस्थित होते.
Comments