माहुली चोर परिसरात वन्य प्राण्यान मुळे पिकाचे नुकसान.


जगली जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी.

 गावकऱ्यांनी दिले वनविभागाला निवेदन

 उत्तम ब्राम्हणवाडे

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील  माहुली चोर गावाच्या पूर्व – पश्चीम भागाला वन विभागाच्या मालकीचे बाभूळबन आहे.त्यामुळे या भागात वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात हैदोस असून हे प्राणी शेतकर्याच्या पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान करतात.

माहुली चोर गावाच्या पूर्व – पश्चीम भागाला वन विभागाच्या मालकीचे बाभूळबन तसेच जळू नदी आहे. वनविभागाच्या या बाभूळबनात रोही,हरीण,डुक्कर, माकडे या वन्य प्राण्यांचा वावर आहे. दिवसा माकडे तर रात्रीला रोही,हरीण,डुक्कर हे प्राणी शेतकर्याच्या शेतात जावून पिक खातात.

 तसेच नासाडी करतात. या प्राण्यान पासून पिकाचे रक्षणा करिता बरेच शेतकरी या पावसाच्या दिवसात रात्रीला सुद्धा शेतात मुक्कामी असतात.तरी सुद्धा प्राणी नुकसान करतात.

वन्यप्राण्यान पासून पिकाच्या नुकसानी बाबत वनविभागा कडे तक्रार केल्यास मिळणारी मदत अत्यंत अल्प असते.तरी या बाबत वनविभागाणे वन्य प्राण्यानचा कायम स्वरूपी बंदोबस्त करावा तसेच शेतकर्यांना तक्रारअर्ज करणे सोयीचे होण्याकरीता कायमस्वरूपी कर्मचारी द्यावा.

 या बाबतची  मागणी येथील शेतकरी निखील चोरे,रोषण पवार,विनेश गायकवाड,सचिन कोकाटे,वैभव चोरे,अक्षय पवार,राजेश पवार,गोपाल दानखडे,अशोक कुलकर्णी,गजानन चोरे,गणेश जगताप,अरविंद चोरे,महेश कोल्हे, प्रदीप चोरे,सुधीर कोरडे,बाबू वाघ,  या शेतकर्यांनी केली आहे.वनविभागाकडे केली आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात