शहराचा पाणी प्रश्न सुटणारा एक्सेप्रेस फीडरच्या ताराची चोरी.
ठेकेदाराच्या संबंधितांकडून पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर शहराला अखंडित विद्युत पुरवठा काही दिवसातच मिळणाऱ्या एक्सेप्रेस फिडरचे समृद्धी ढाब्याजवळ नांद सावंगी नांदगाव खंडेश्वर येथे नगरपंचायत पाणीपुरवठा विभाग अंतर्गत चांदी प्रकल्प मुंडवाडा 11 kv एक्सेप्रेस फिडरच्या ठेक्याचे काम एक महिन्यापासून सुरू होते.27/7/2023 रोजी समृद्धी ढाब्याजवळ नांदसावंगी नांदगाव खंडेश्वर 10 गाल्यांमधील ऐकून 11 पोलवरील 4500 ॲल्युमिनियमचा वायर की. अ.60,000 रुपयाचा वायर कुणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेला असल्याची तक्रार तेजस सुहासराव मेश्राम (सुपरवायझर ) रा. धामणगाव रेल्वे यांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन येथे 28/7/2023 रोजी तक्रार दाखल केली आहे या एक्सेप्रेस फिडर करिता एक कोटी नऊ लक्ष रुपयाचा निधी प्राप्त केला व या एक्सेस फिटरच्या कामाला सुरुवात झाली होती. येत्या एक महिन्याच्या कालावधीत हे काम पूर्ण होऊन याचा फायदा शहराला होणार होता यामुळे चांदी प्रकल्पावर 24 तास विद्युत पुरवठा राहणार असल्याचे व सुरळीत पाणीपुरवठा मिळवून तीन ते चार दिवसांवर पाणी पुरवठा आता शहराला मिळणार असल्याने शहरवासी सुद्धा सुखावले होते.एक्सप्रेस फिडरचा वायर चोरी गेल्याने पुन्हा काम लांबणीवर गेले आहेत. रोज विद्युत पुरवठा होणार असलेल्या नांदगाव वाशी यांना निराशा हाती लागणार की? लवकरात लवकर कमी दिवसांमध्ये पाणी मिळेल. असा प्रश्न शहरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.
Comments