बेंबळा नदी पात्राच्या पुलावरील कठडे तुटले.
ऐन वळणावरील कठडे तुटल्याने अपघाताला आमंत्रण.
नांदगाव खंडेश्वर - शिवणी रस्त्यावरील पुल, संबंधित विभागाचे दुर्लक्ष.
उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर ते शिवणी रस्त्यावरील बेंबळा नदी पात्राच्या पुलावरील कठडे तुटल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
नांदगाव ते शिवणी रस्त्यावर मोठे बेंबळा नदी पात्र असुन यावर पुल उभारलेला आहे.
या पुलावर कठडे असुन ते तुटलेल्या अवस्थेत आहे. ऐन वळणावरील कठडे तुटल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे.
तसेच समोरील दुसऱ्या पुलावरील सुध्दा कठडे काही ठिकाणी तुटलेले आहे. सद्या पावसाळ्याचे दिवस असुन सदर रस्त्यावरून प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे या दिवसांत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर ठिकाणच्या दोन्ही पुलावर कठडे बसविण्याची मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.
Comments