रक्तदान शिबीर आयोजकांचा गौरव सोहळा संपन्न
नंदकिशोर इंगळे यांचा सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान.
जिल्हा सामान्य रुग्णालय, विभागीय रक्तपेढी व रक्त घटक विलगीकरण केंद्र अमरावती च्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवन अमरावती येथे रक्तदान शिबिर आयोजकांचा गौरव सोहळा पार पडला.
या गौरव सोहळ्यात रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ येथील पत्रकार नंदकिशोर किसनराव इंगळे यांचा सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन अमरावती महानगरपालिका आयुक्त देविदास पवार निवासी
वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र सोळंके यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी रक्तपेढी प्रमुख आशिष वाघमारे, बालरोग तज्ञ डॉ. सुनील पाटील, रक्त संकलन अधिकारी डॉ. संदेश हेमलवाड,
जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे, आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला रक्तदान चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments