महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांची तहसील कार्यालयाला भेट.
तहसील परिसरात केले वृक्षारोपण.
नवीन इमारतीची केली पाहणी.
उत्तम ब्राम्हणवाडे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताह निमित्त तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे तीन ऑगस्ट रोजी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची तहसील कार्यालय पाहणी व माणुसकीची भिंत योजनेचा उद्घाटन तसेच तहसील कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी यांचे स्वागत तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी केले.आणि जिल्हाधिकारी यांनी तहसील कार्यालयच्या कक्षात विविध कार्यालयातील विभागांचा आढावा घेतला यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत नाटकर, तालुका कृषी अधिकारी, रोशन इंदोरे, नायब तहसीलदार,बबन राठोड,महसूल पुरवठा निरीक्षक श्रीमती शीतल राठोड आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी तालुक्यातील कामाचा सुद्धा आढावा घेतला
त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तहसील कार्यालयातील प्रत्येक विभागात भेट देऊन पाहणी केली. तसेच कर्मचारी यांना त्यांचे कामाबाबत विचारणासुद्धा केली.
.....................................................................
महसूल सप्ताह निमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेची पाहणी.
महसूल सप्ताह निमित्त आयोजित तहसील कार्यालयातील रांगोळी स्पर्धेची यावेळी जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून
माणुसकीची भिंत या कर्मचारी व अधिकारी यांनी जमा केलेल्या कपड्यांचे गरजू लोकांना वाटप करण्यात आले.
Comments