सालोड कसबा येथे छत्रपती शाहू महाराज विद्यालयात गणवेश वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

सालोड कसबा येथे छत्रपती शाहू महाराज विद्यालयात गणवेश वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

उत्तम ब्राम्हणवाडे.

आपण चांगल्या विद्यालयात शिक्षण घेत असून संस्थेने शाळेला सर्व भौतिक सुविधा व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहेत. याचा आपण चांगला उपयोग घेऊन या देशाचे आदर्श नागरिक व्हा आणि देशाची व समाजाचे आपल्या हातून सेवा घडू द्या तसेच शालेय परिसरात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे किती गरजेचे आहे अशा विषयाचा प्रतिपादन समाजभूषण मधुकरराव अभ्यंकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. ते सालोड कसबा येथील शाहू महाराज विद्यालय व श्री वसंतदादा पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित केलेल्या शालेय गणवेश वितरण व राष्ट्रीय वृक्षारोपण एक विद्यार्थी एक वृक्ष या उपक्रमा प्रसंगी प्रतिपादन केले.
         यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री प्रकाश तायडे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगरूळ चव्हाळा तसेच प्रचार्य गजानन वानखडे श्री प्रकाश पाटील इंझळकर युवा कार्यकर्ते सुनील पाटील इंजळकर इत्यादी उपस्थित होते.
        याप्रसंगी संस्थेच्या वतीने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच वृक्षारोपणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ठाणेदार श्री प्रकाशराव तायडे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थी शाळेत शिकत असताना त्यांचा सर्वांगीण विकास होणे अत्यंत महत्त्वाचे असून भावी जीवनात तो शिस्तप्रिय नागरिक घडला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
        याप्रसंगी प्राचार्य गजाननराव वानखडे यांनी शाळा शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यामध्ये महत्त्वाच्या घटकांचा समन्वय असणे आवश्यक आहे . त्या घटकांमध्ये विद्यालयातील सर्वच घटक सक्रिय असल्यामुळे संस्थेची प्रगती वाखाण्याजोगी आहे असे प्रतिपादन केले.
         याप्रसंगी ठाणेदार प्रकाशराव तायडे यांचा समाजभूषण मधुकरराव अभ्यंकर यांच्या शुभहस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . त्याचबरोबर समाजभूषण मधुकरराव अभ्यंकर यांचा विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश पवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यालयातीलतील शालांत प्रमाणपत्र परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.
          याप्रसंगी जगदीश ढगे मोबीनभाई हन्नान भाई अक्रम भाई नीलेश मुधोळकर प्रमोदराव मिसाळ प्रफुल्ल ठाकरे राजू वाघाडे इत्यादी मान्यवर मंडळी व पालक उपस्थित होते.
      कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री अविनाश पवार यांनी केले कार्यक्रमाचे संचालन प्रा. वैशाली रहाटे तर आभार प्रदर्शन सौ रूपाली विचे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा.अनिल गवळी प्रा.मोहिनी माकोडे प्रा. मोनु सरदार माधव कानबाले विनोद इंगळे आकाश वंजारी विकास फसाटे प्रदीप नितनवरे अभिनंदन गवई गोरखनाथ पर्वतकर उमेश विलायतकर गजानन भोंगरे शुभम इंझळकर सविता राऊत रेखाताई इंगळकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात