जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप.
वाघोडा येथील निलेश खंडार याचा उपक्रम.
इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना वाटल्या स्कूल बॅग.
उत्तम ब्राम्हणवाडे
स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोडा या गावातील माजी विद्यार्थी निलेश खंडार यांनी आपल्या आई स्व. रेखा रमेश खंदार यांच्या स्मृतिदिनानिमित्त वर्ग एक ते पाचच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप केले.
यावेळी गावातील ग्रामपंचायत सरपंच सौ.जीविता विनोद जगताप,उपसरपंच ओमप्रकाश सावळे ग्रा.प.सदस्य सुशीला बाळे. स्मिता सुनील मेटकर, बेबी शिरकरे, नारायण भगवे आणि शालेय शिक्षण समिती अध्यक्ष मधुकर शालिग्राम, गाढवे मुख्याध्यापक अबरार सर, तंटामुक्तीचे अध्यक्ष विजय ढाकुलकर,
युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष दिपक भगत, हरीश जगताप युवक काँग्रेस उपाध्यक्ष सागर मेटकर, अध्यक्ष युवक काँग्रेस वाघोडा गोपाल भगवे, अनिल बाडे, वैष्णव मेटकर, विकास भगत, धीरज मेहेंगे, हर्षल घाटे, तेजस सुलताने,सुयोग जाधव,तेजस ठाकरे,देविद ठाकरे,मिलिंद ठाकरे,गोपाळ ठाकरे, प्रतीक गावणर , समीर मांडवधरे , प्रज्वल ठाकरे, एन एस यु आय उपाध्यक्ष चेतन धवणे सुजल ठाकरे सुरज भगवे व गावातील संपूर्ण गावकरी मंडळी उपस्थित होते.
Comments