इंडियन बँकेने शेतकऱ्यांचे खाते केले होल्ड.
पापळ येथील शेतकऱ्यात तीव्र संताप.
शेतकरी नेते छोटू मुंदे यांनी दिला आंदोलनाचा इशारा.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ येथील इंडियन बँकेचे शाखा व्यवस्थापक हे शेतकऱ्याचे पीक कर्ज पंतप्रधान किसान योजना अंतर्गत मिळणाऱ्या लाभातून कपात करीत असल्याने शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण दिसून येत आहे याबाबत विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटू मुंदे यांनी नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना तक्रार सादर केली असून याबाबत आपला आक्षेप नोंदविला आहे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,
मी तालुक्यातील राजना या गावचा रहिवासी असून मौजे पापळ येथील शेतकऱ्यांनी इंडियन बँकेच्या शाखेमध्ये आपली शेती तारनावर ठेवलेली आहे आणि शेतीच्या वहीवाटी करिता पीककर्ज घेतलेले आहे आणि शेतकरी आपआपल्या परिस्थितीनुसार बँकेचे कर्जाची परतफेड सुद्धा करत आहेत. शेतकऱ्यांना पीएम किसान योजना अंतर्गत दोन हजार रुपये मिळाले आहेत परंतु पापळ येथील शाखा व्यवस्थापक यांनी शेतकऱ्यांना मिळत असलेले 2000 हजार रुपये पीक कर्जात कापून घेतले आहे त्यासाठी शाखा व्यवस्थापकांनी शेतकऱ्याचे खाते होल्ड केलेले आहे.2000 रुपयाची मदत शासन देत असताना बँकेचे शाखा व्यवस्थापकांना हे पहावल्या जात नाही. अगोदरच शेतकरी यांच्यावर निसर्ग कोपला असताना त्यात बँकेमध्ये देखील शेतकऱ्यांना अश्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे याकडे तहसीलदार यांनी जातीने लक्ष देऊन शेतकऱ्यांवरील हा अन्याय दूर करण्याची मागणी निवेदनाद्वारे छोटू मुंदे यांनी केली आहे.
आणि शेतकऱ्याचे होल्ड केलेले खाते पुन्हा सुरू करण्याचे आदेश द्यावे व शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे सुरळीत लाभ देण्यात यावा अशी मागणी केली आहे अन्यथा याविरुद्ध पापळ येथील सर्व शेतकरी पिक कर्जधारक यांना सोबत घेऊन नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकान्वये शेतकरी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटू मुंदे यांनी दिला आहे.
Comments